साटम हसले, राज ठाकरे भडकले, आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतोय

Amit Satam Viral Video Row Raj Thackeray Slams Bjp Sakinaka Incident: साकीनाक्यातील अस्लम शेख यांच्या मृत्यूनंतर विधानभवनातील भाजप आमदार अमित साटम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला... मात्र याचं व्हिडिओत हसत असलेल्या साटमांना विरोधकांनी आता चांगलचं घेरलयं... नेमकं प्रकरण काय आहे? राज ठाकरेंनी भाजपवर कसा हल्लाबोल केलाय..पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
BJP MLA Amit Satam’s viral video triggers political backlash after Sakinaka tragedy
BJP MLA Amit Satam’s viral video triggers political backlash after Sakinaka tragedysaam tv
Published On

ऐकलतं... साकीनाक्यातील मॅनहोल दुर्घटनेनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी हसत हसत केलेल्या या विधानानं आता राजकीय वातावरण चांगलचं तापलयं..आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहीत भाजपवर तोफ डागलीय. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ऐका...

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत...

देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ?

दुसरीकडे खासदार संजय राऊतांनीही अमित साटम यांचा फोटो शेअर करत "मौत के सौदागर, मुंबई भाजपचा क्रूर चेहरा!" अशी टीका केलीय... साटमांच्या कृतीला त्यांनी थेट असंवेदनशीलतेचं लक्षण म्हटलयं...दरम्यान विरोधकांनी याप्रकरणी राळ उठवल्यानंतर अमित साटम यांनी ठाकरेंवर फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा आरोप केला... मात्र हसलात तुम्ही, मग फेक नॅरेटिव्ह आम्ही कसा पसरवला, असं म्हणत मनसेच्या संदीप देशपांडेंनी साटमांवर पुन्हा हल्लाबोल केलाय...

साकीनाका आणि चेंबूरमधील घटनेनंतर नागरिकांमध्येच आधीच रोष आहे. अशातच लोकप्रतिनिधींचा असा असंवेदनशीलपणा अधिक संतापजनक आहे.. म्हणूनच या अशा लोकप्रतिनिधींना समज देण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com