

अजितदादांच्या विमान अपघातावर प्रश्न उपस्थित
अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचं मोठं भाष्य
रोहित पवारांनी सांगितला अपघाताचा घटनाक्रम
अजितदादांच्या विमान अपघातानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजितदादांचा घातपात झाल्याचाही अनेक बड्या नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे काही नेत्यांकडून दादांच्या घातपाताचे दावे फेटाळून लावले आहेत. मात्र, आता रोहित पवारांनीच अजित पवारांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. अजितदादांचा विमान अपघात नेमका कसा झाला, याचा घटनाक्रम रोहित पवारांनी सांगितला.
रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'अजितदादांना घेऊन विमान उड्डाण करत होतं. व्हीव्हीआयपी व्यक्तींना विमान जातंय. विमानाच्या लँडिगसाठी पहिला प्रयत्न केला. परंतु दिसत नसल्याने केलं नाही. दुसऱ्यांदाही कदाचित दिसलं नसावं. त्यांनी तिसऱ्यांदा राऊंड घ्यायला हवा होता. दुसर्या प्रयत्नाला जायचं होतं. त्याचवेळी दुर्दैवानं ही घटना घडली असावी'.
रोहित पवारांनी यावेळी व्हिएसआर कंपनीबाबत मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार म्हणाले, 'व्हिएसआरला अद्याप का परवानगी दिली जाते.एवढं फेव्हर का केलं जातं. जे माजी पायलट होते. मी डीजीसीएच्या माजी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन - १२ तासांचा गॅप असतो. कंपनीकडून रिपोर्ट मॅन्युप्युलेट केले जातात. त्यात कॉकपीट व्हाइस रेकॉर्डिंग आणि ब्लॅकबॉक्स असते. यात साधे रेकॉर्डर असतात. संभाषण काय झालं....हे दिलं जातं. व्हिएसआरमध्ये रेकॉर्डर बंद ठेवले जातात'.
रोहित पवारांनी सांगितलं की, 'ते विमान १६ वर्षांपूर्वीचं होतं. विमान प्रवास घटना घडायच्या आधी कुठे कुठे गेलं होतं. विमान चांगल्या स्थितीत होते, मेंटेन होते असं कंपनीच्या मालकांनी सांगितलं. अपघात दृश्यमानतेमुळं झाल्याची शक्यता आहे, असे सांगितले गेले. हे विमान जेव्हा गावावरून गेलं होतं, आवाज वेगळा आला होता...मेटेंन्सचा इश्यू असू शकतो. ग्रामपंचायतमधील व्हिडिओ पाहिला. विमान हे सरळ आलं. नंतर कलंडलं. त्यानंतर स्फोट झाल्याचा सीसीटीव्हीत बघायला मिळालं'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.