Chhagan Bhujbal: 'पक्ष म्हटल्यानंतर...मनाप्रमाणे होत नाही,' खासदार होण्याची इच्छा आहेच; छगन भुजबळ पुन्हा बोलले

Chhagan Bhujbal On Lok Sabha Election: माध्यमांशी बोलताना आज मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पवारांच्या घराणेशाहीवर बोलणं टाळलं आहे.
छगन भुजबळ
Chhagan BhujbalSaam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

अजित पवार गटाने छगन भुजबळ यांना लोकसभा आणि राज्यसभेतून डावलल्यानंतर ते नाराज असल्याच्या चर्चांणा उधाण आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, यापूर्वी मी पाचवेळा मिटिंग घेतल्या आहेत. खासदार होण्याची इच्छा आहेच. नाशिकमध्ये खासदारकी लढवण्यास तयार झालो होतो, दिल्लीतून माझं तिकीट फायनल झालं होतं, मी कामाला लागलो होतो.

मात्र, नंतर नाशिकमध्ये अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी तिकीट जाहीर करण्यात आलं. त्याचा जय पराजयावर परिणाम होत असल्याचं भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी खासदारकीची इच्छा बोलुन दाखवली आहे. पक्ष म्हटल्यानंतर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. काहीवेळेला थांबावं लागतं, जेवढी शिवसेना तेवढं माझं वय आहे, अनेकवेळा असं झालं असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात महायुती का मागे पडली? याचा अभ्यास करण्याची गरज आहे. '४०० पार'चा नारा दिला म्हणून संविधान बदलणार असा प्रचार करण्यात आला. यामुळे आदिवासी, दलित आणि मुस्लिम समाज दूर गेलेत. आपल्या निकालामुळे आरएसएस नाराज होणं स्वाभाविक आहे. विधानसभा जागा वाटपासंदर्भातला दावा आजही कायम असल्याचं छगन भुजबळ म्हणाले (Ajit Pawar) आहेत.

छगन भुजबळ
Chhagan Bhujbal News: 'त्यांनी माफी मागितली, भावना लक्षात घ्यायला हवी', छगन भुजबळांकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण!

यावेळी छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्या महायुती फुटणार या दाव्याला देखील उत्तर (Lok Sabha Election) दिलंय. त्यासंदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की, त्यांनी कुठे भविष्य बघितलं माहिती नाही. मात्र, मी पाहिलेल्या भविष्यात असं कुठे दिसत नाही. भुजबळांनी मात्र, यावेळी पवारांच्या घराणेशाहीवर बोलणं टाळलं आहे. परंतु भिडे वाड्याच्या कामाचा मुद्दा त्यांनी उचलला आहे. भिडे वाड्याचं काम पुढे जात नाही, मध्ये निवडणुका (Maharashtra Politics) आल्या होत्या. भिडे वाड्याच्या बाजूची जागा मोकळी करावी आणि महात्मा फुले वाडा जोडावा. सरकारी अधिकारी काम करत नाही, आम्ही आंदोलन करायला पाहिजेत का ? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.

छगन भुजबळ
Chhagan Bhujbal: लोकसभेनंतर राज्यसभेची उमेदवारी डावलली; मंत्री छगन भुजबळ नाराज? अजित पवार गट काय निर्णय घेणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com