पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार मुंबईकडे रवाना.
दुपारी १२ वाजता मराठा आरक्षणावर उपसमितीची महत्त्वाची बैठक.
उदय सामंत, चंद्रकांत पाटील ऑनलाईन उपस्थित राहणार.
आजच मराठा आरक्षणावर तोडगा निघणार का? राज्यभरात चर्चा.
Will Maratha reservation issue be resolved today in cabinet sub-committee meeting? : पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार मुंबईच्या दिशेने तातडीने रवाना झाले आहेत. आज मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता मंत्री मंडळ उपसमितीची बैठक पार पडणार आहे. उदय सामंत, चंद्रकांत पाटील हे या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे समजतेय. तर मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आपले पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर आजच तोडगा निघणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर दिसणार नाहीत. शरद पवारही आज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत, तेही मुंबईकडे रवाना होणार असल्याचे समजतेय. त्यामुळे आजच मराठा आरक्षणावर तोडगा निघू शकतो, असे सांगण्यात येतेय. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी येणार होते. त्यासाठी त्यांनी वेळ सुद्धा दिली होती, मात्र अचानक त्यांना मुंबईला जावे लागणार असल्याने ते आज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आमदार माऊली कटके यांनी दिली.
मराठा आरक्षण उपसमितीच बैठक, तोडगा निघणार? | Maratha Reservation
मराठा आरक्षणाबाबत आज उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार? तोडगा निघणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आंदोलकांची मागणी, सरकारची भूमिका आणि पुढील दिशा या बैठकीनंतर आज ठरणार आहे.
जरांगेंनी संयम ठेवावा, मागण्या मान्य होतील - सामंत
मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. जरांगे यांनी संयम ठेवला पाहिजे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा उपयोग मतांसाठी केला जात असल्याचा आरोप मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावा की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे असा सवाल उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं का? महाविकास आघाडीचे नेते याबद्दल काहीही स्पष्ट करत नाहीत. जरांगे यांच्या आंदोलनावर अनेक जण आपला मतांचा आकडा ठरवत आहेत, असे सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह देखील बोलावलं होतं... एकनाथ शिंदे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर घेतलेल्या शक्तीच्या उल्लेखावर उदय सामंत यांचे उत्तर दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.