Ajit Pawar birth anniversary : महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै, २०२६ रोजी एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले. या नव्या आदेशानुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील अधिकृत राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे आता शासकीय स्तरावर अजितदादांची जयंती अधिकृतपणे साजरी केली जाणार आहे.
या परिपत्रकानुसार, येत्या २२ जुलै, २०२६ (बुधवार) रोजी राज्यभरात ही जयंती साजरी होईल. या दिवशी मुंबईतील मंत्रालयापासून ते राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले जाईल. हा आदेश केवळ शासकीय कार्यालयांपुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनाही बंधनकारक करण्यात आला आहे. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात या कार्यक्रमाचे योग्य नियोजन व अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
राज्य शासनाने स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे. यासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केले आहे. स्व. अजित अनंतराव पवार यांनी सार्वजनिक जीवनात केलेल्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कन्हेरी येथील पर्यटन उद्यानाचे "स्व.मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान" नामकरण
कन्हेरी येथील पर्यटन उद्यानाचे "स्व.मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान", ता. बारामती, जि.पुणे असे नामकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या वन विभागाचा आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे; राज्याचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वा. या उद्यानाच्या नामकरण फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.