लोकांच्या कल्याणासाठी संत नेहमी चांगल्या वागणुकीचा संदेश देत असतात.. हा उपदेश करण्याचा अधिकार त्यांनी स्वतःच् प्राप्त केला आहे .. त्याचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कीर्तनकारांचा सत्काराचा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.. या कार्यक्रमाचे आयोजन सचिन जाधव मित्र मंडळाने केले होते .. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील ३०० नामवंत कीर्तनकारांचा सन्मान मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला .. यावेळी शेकडो कीर्तनकार तसेच ग्रामीण भागातून आलेले वारकरी संप्रदायाचे नागरिक उपस्थित होते.. आलेल्या सर्व वारकरी आणि कीर्तनकार मंडळींना यावेळी पुरण पोळीचे जेवण देखील या मित्र मंडळाने दिलेय..
पावसाळ्यात कोकणाचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून जाते यातच रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ सडे रानफुलांनी बहरून गेले आहेत. जिल्ह्यातील सापुचेतळे भागातील कातळ सड्यांवर तिरड्याची रानफुले, कारवी, टोपली कारवी, निळपुष्पी, सडसडी, सोनकी, जांभळीपुष्पी, सोनतळ आधी रानफुलांनी कातळसड्यांवर रंगबेरंगी पांघरून घातल्याचा आभास होतो. श्रावण मासात विविध सणांमध्ये या रानफुलांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अनेक रानफुले औषधी देखील आहेत.
सातारा शहरांमध्ये गणेश मिरवणुकी दरम्यान डॉल्बी वाजणार का ? या प्रश्नावर दोन दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नंतर पडदा पडला होता. त्यानंतर काल रात्री सातारा शहरातील गणेश मंडळानी गणेश मूर्ती आगमनाच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम देखील लावली. दहा वाजायच्या आत ही मिरवणूक मंडळाकडून संपवण्यात आली परंतु नंतर सातारा पोलिसांकडून या मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला असून लावण्यात आलेली साऊंड सिस्टिम देखील पोलिसांनी जप्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अखेर गणेश उत्सवा दरम्यान आता नेमक ऐकायचं कुणाचं पालकमंत्र्यांचं की पोलीस प्रशासनाचा असा प्रश्न साताऱ्यातील गणेश उत्सव मंडळांना पडला आहे.
अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अमरावती शहरातील रायली प्लॉट येथील अवैध हुक्का पार्लरवर धाड टाकून २,८७,४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एम.डी. (मॅफेडॉन) अंमली पदार्थ, गांजा, विदेशी दारू, हुक्का सेवन साहित्य आणि मोबाईल यांचा समावेश आहे.पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या आदेशानुसार पीआय संदीप चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रमेन्द्र ओमप्रकाश शर्मा (५५) याने आपल्या घराच्या टेरेसवर ‘काफिला’ नावाचा हुक्का पार्लर चालवत असल्याचे समोर आले. तेथे विदेशी दारू विक्री व अंमली पदार्थांचे सेवनही होत असल्याची खात्री पटल्यावर पथकाने धाड टाकली.
या वेळी पथकाला प्रतिकार करत आरोपींनी हुज्जतबाजी, झटापट केली आणि काही ग्राहकांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी एकूण ११ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २५ ग्रॅम गांजा, ३ ग्रॅम एम.डी., विविध हुक्का साहित्य, नगदी व विदेशी दारू जप्त करण्यात आली.
धाराशिव- तुळजापूर तालुक्यामध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच पक्षप्रवेश देण्यासाठी चढाओढ लागली आहे.तुळजापूर तालुक्यातील भाजपमध्ये असलेल्या काही सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनकडुन बांधणी केली जात आहे.
- महानगरपालिकेने स्वच्छता आणि संपदा शुल्कावरील सूट कायम ठेवली
- या सवलती बरोबरच मनपाने रविवारी परवानगी प्रक्रियेसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले
- पहिल्याच दिवशी पाच झोन मधून बारा अर्ज प्राप्त झाले
- आधी मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी 250 रुपये तर स्वच्छता आणि संपदा विभागासाठी एक हजार रुपये शुल्क आकारात होती
- मंडळांना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवणार नाही असे शपथ पत्र सादर करावे लागणार
अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत येत असलेल्या वलगाव नांदगाव पेठ,भातकुली या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांच्या घर भाडे भत्त्यात कपात करण्यात आली आहे. जवळपास एका अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्याच्या घर भाडे भत्त्यात साडेचार हजार ते पाच हजार रुपयाची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या इतर पोलीस स्टेशन प्रमाणे या तीनही पोलिसांना घरभाडे भत्ता सारखा असावा अशी मागणी पोलीस पत्नींनी केली आहे... सोबतच वलगाव,नांदगाव पेठ,भातकुली या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये घर भाडे भत्ता कमी असल्यामुळे व इतर सुख सुविधा नसल्यामुळे या ठिकाणी बदली झालेले अधिकारी, कर्मचारी वलगाव, नांदगाव पेठ ,भातकुली या तिन्ही पोलीस स्टेशनमधील रुजू होण्यास टाळाटाळ करत करतात.. त्यामुळे यामध्ये तोडगा काढण्यासाठी पोलीस पत्नीने थेट गृहमंत्र्यांनाच त्याबाबत विनंती केली आहे..
जालन्यातील अंबडच्या तहसीलदारांनी मागील वर्षभरात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 26 वाळूमाफियांच्या मालमत्तेवर तब्बल 7 कोटी 52 लाखांचा बोजा चढविला आहे. अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर वर्षभरात महसूल प्रशासनाने वेळोवेळी कडक कारवाई करत 1 ऑगस्ट 2024 ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये 26 वाळूमाफियांवर विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या मालमत्तेवर 7 कोटी 52 लाख रुपयांचा बोजा महसूल प्रशासनाने चढवला आहे त्यामुळे अंबड तालुक्यातील वाळू माफीयांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने रात्रगस्त सुरु असून यापुढे कोणी अवैध वाळू उपसा करताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा अंबडच्या तहसीलदारांनी दिला आहे..
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात खासदारांचा होणार मोर्चा
संसद भवन ते निवडणूक आयोग असा एक किलोमीटर मोर्चाचा मार्ग
महाराष्ट्र, कर्नाटक मधील मतदार याद्यातील घोळ समोर आणल्यानंतर राहुल गांधी यांनी केली मोर्चाची घोषणा
बिहार मधील मतदार यादी सुधारणा (SIR) ला देखील आघाडीचा विरोध
जाणीवपूर्वक अनेकांची नाव यादीतून वगळली जात असल्याचा आरोप
बीड जिल्हा कारागृहातील बॅरेक नंबर चारमध्ये असलेल्या चार कैद्यांमध्ये गांजा वाटून घेण्यावरुन वाद झाला... हा वाद ऐकून तिकडे गेलेल्या कर्मचार्यावरच या चार कैद्यांनी धावून जात शिवीगाळ केली.. तसेच बाहेर सुटल्यावर तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली... गंभीर बाब म्हणजे यात खोक्या भोसलेचा देखील समोवश आहे.. खोक्या भोसले हा चार गुन्ह्यांमध्ये सध्या कारागृहात असून त्याच्यासह शाम पवार, वसीम पठाण, यमराज राठोड या तिघांमध्ये हा वाद झाला... आता या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय मोरे हे करत आहेत..
रात्रीतून मुंबई महापालिकेकडून बांबू आणि ताडपत्री लावण्याचं काम करण्यात आलेय
तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
मान्यता प्राप्त निवासी आणि व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांचे नामफलक मराठीत लिहिण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले आहेत. याबाबत मनसे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी केली होती.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार प्राप्त रेखांकन आणि बांधकाम प्रस्तावांना पुणे महापालिकेमार्फत परवानगी देण्यात येते.
त्यानंतर विकसकामार्फत मान्य बांधकाम परवानगी नुसार प्रत्यक्ष जागेवर काम करण्यात येते. विकसकांमार्फत होत असलेल्या विविध निवासी आणि अनिवासी इमारत विकास प्रकल्पांचे नामफलक मराठी भाषेत ठळक अक्षरात दर्शनी भागात दर्शवणे या कार्यालयीन परिपत्रकाच्या दिनांकापासून अनिवार्य करण्यात येत आहे,असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
महिन्याच्या पहिल्या ४ दिवस पावसाची चांगली नोंद मात्र पाच ऑगस्टपासून पाणलोट क्षेत्रात पावसाने मारली दडी
खडकवासला धरणक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गेले दीड महिन्यात मुळा-मुठा नदीत करण्यात आला आहे.
खडकवासला,पानशेत,वरसगाव व टेमघर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा
खडकवासला 1.12 टीएमसी
पानशेत 9.57 टीएमसी
वरसगाव 11.58 टीएमसी
टेमघर 3.49 टीएमसी
एकूण पाणीसाठा 25.79 टीएमसी म्हणजे 88.47 टक्के पाणीसाठा उपलब्ध
गेल्या वर्षी याच वेळी 27.73 टीएमसी म्हणजे 95.12 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
ऊस द्राक्ष, डाळिंब आणि केळी उत्पादनासाठी आग्रेसर असलेल्या पंढरपूर तालुक्यात तब्बल 20 वर्षांनंतर कडधान्यांचा पेरा वाढला आहे. यंदाच्या खरिप हंगामात उडीद,तूर,मूग या कडधान्यासह सूर्यफूल भुईमूग या तेलबियांची सुमारे पाच हजार एकरावर लागवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक दोन हजार चारशे एकरावर उडीद पिकाची लागवड केली आहे. ही लागवड प्रामुख्याने द्राक्ष डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या तालुक्यातील कासेगाव,करकंब चळे या भागात सर्वाधिक झाली आहे.
बदलत्या हवामानामुळे द्राक्ष डाळिंब बागांवर वाढलेला किडीचा प्रादुर्भाव आणि बाजारातील दराची अनिश्चिती यामुळे फळबाग शेती संकटात आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्यांचा कडधान्य लागवडी कल वाढला आहे.
यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावर वाजता व्यावसायिकांच्या मालवाहू वाहनावर हल्ला करून त्याला लुटण्यात आले या घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी दोघांना अटक केली.मात्र इतर चार आरोपी पसार झाले होते, हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात पुढे आले आरोपीचा शोध घेत असताना एलसीबीच्या पुसद पथकाने सापळा रचून वडद जिल्हा परभणी इथून दोघांना अटक केलीये. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. नामदेव चव्हाण आणि संतोष चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना , नजर कैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केलाय, सोयाबीनला 6 हजार प्रतिक्विंटल भाव द्या यासह इतर मागण्या घेऊन , 2013 साली स्वतः देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे आणि पाशा पटेल यांनी पायी दिंडी काढली होती, मात्र आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आहेत आणि मंत्रिमंडळात पंकजा मुंडे देखील आहेत, मात्र सोयाबीनला सहा हजार भाव का मिळत नाही , या प्रश्नांची उत्तर विचारण्यासाठी, हे शेतकरी संघटनेचे नेते आज शहरात पायी दिंडी काढत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते,मात्र त्यापूर्वीच या शेतकरी नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे आहे.
पावसाळ्यात कोकणाचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून जाते यातच रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ सडे रानफुलांनी बहरून गेले आहेत. जिल्ह्यातील सापुचेतळे भागातील कातळ सड्यांवर तिरड्याची रानफुले, कारवी, टोपली कारवी, निळपुष्पी, सडसडी, सोनकी, जांभळीपुष्पी, सोनतळ आधी रानफुलांनी कातळसड्यांवर रंगबेरंगी पांघरून घातल्याचा आभास होतो. श्रावण मासात विविध सणांमध्ये या रानफुलांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अनेक रानफुले औषधी देखील आहेत.
सिडकोच्या घरांची लॉटरी आता लांबणीवरच
सिडको कडून 15 ऑगस्ट रोजी जम्बो लॉटरी करण्याचा प्लॅन होता
मात्र नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सिडकोच्या घरांच्या किमती करण्याबाबत अजूनही बैठक झाली नसल्यामुळे
त्यामुळे सिडकोची लॉटरी आता लांबणीवर पडणार आहे
पावसाळी अधिवेशनामध्ये घरांच्या किमती करण्यासंदर्भामध्ये बैठक घेतली जाईल असा आश्वासन मंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आलं होतं
मात्र सिडकोच्या घरांची किमती करण्यासंदर्भामध्ये कोणताही निर्णय अजून घेतला जात नाहीये
त्यामुळे सोडत धारक सुद्धा अडचणीत सापडले आहेत
मुंबई- गोवा महामार्ग गेले अनेक वर्षांपासून रखडलेला आहे.. अनेक वेळा आंदोलने करण्यात आले. मात्र रस्त्याचे काम काही पूर्ण झाले नाही..अनेक वेळा अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अखेर या संदर्भात आता मुंबई गोवा जनआक्रोश समिती ही आक्रमक झाली असून आंदोलन पुकारलेले आहे..
दरम्यान या आंदोलनचा भाग म्हणून पनवेल येथील पळस्पे येथे पाटपूजन कार्यक्रम पार पडला.. यावेळी मोठ्या संख्येने कोकणर नागरिक उपस्थित होते.. तर सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.तर पुढचा आंदोलन हे पेण मध्ये होणार असून, पुन्हा लांजा ते मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील बंगल्या पर्यंत हे आंदोलन असणार आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.