Ahmedabad Plane Crash : जाने वो कौनसा देश, जहाँ तुम चले गये; दीपक यांना अखेरचा निरोप, आई-ताई धाय मोकलून रडल्या

Deepak Pathak : १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेलं एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं. या अपघातात विमानात केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला होता.
 cabin crew deepak pathak last rites
cabin crew deepak pathak last rites Saam Tv News
Published On

बदलापूर : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बदलापूरचे रहिवासी आणि एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर दीपक पाठक यांचा मृतदेह आज बदलापुरातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला. यावेळी बदलापूरकरांनी साश्रूनयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तर दीपक यांचं पार्थिव पाहून कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. मांजर्लीतल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेलं एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं. या अपघातात विमानात केबिन क्रू म्हणून काम करणाऱ्या दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला होता. मात्र, डीएनए टेस्ट करून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मोठा कालावधी गेला. अखेर अपघाताच्या ९व्या दिवशी त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. आज दीपक यांचा मृतदेह बदलापूरच्या कात्रप परिसरातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आला. तिथे बदलापूरकरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती.

 cabin crew deepak pathak last rites
Nandurbar: नदीत आंघोळीला उतरला, मगरीनं पायाचा लचकाच तोडला; नंदूरबारमध्ये खळबळ

दीपक यांचं पार्थिव पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. त्यांच्या अंत्ययात्रेत शेकडो बदलापूरकर सहभागी झाले होते. अंत्यदर्शनानंतर बदलापूरमधल्या मांजर्ली स्मशानभूमी दीपक यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपक यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

 cabin crew deepak pathak last rites
Thane News : विजेच्या लाईनवर झाडांच्या फांद्या, १७ वर्षीय बालकामगाराला झाडावर चढवलं; हात लावताच खाली कोसळला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com