
ठाणे : शहापूर येथील अघई येथे ओरिएंटल प्लायवूड कंपनीत अल्पवयीन परप्रांतीय बाल मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही कंपनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असून प्रकरण लपविण्यासाठी बालमजुराचा मृतदेह शहापूर तालुक्यातून पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील रूग्णालयात घेऊन गेले. शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यत क्षेत्रात अघई ग्रामपंचायत हद्दीत ओरिएंटल प्रायव्हेट लिमिटेड ही प्लायवूड बनविणारी कंपनी आहे. या कंपनीत जास्त कामगार हे परप्रांतीय असून यामध्ये बालमजूरांचा समावेश आहे.
काल दुपारनंतर कंपनीच्या हाय टेन्शन विजेच्या लाईनवर झाडांच्या फांद्या आल्याने ते तोडण्यासाठी इमराज सनपा भाभोरे (वय १७, रा. मध्य प्रदेश, झाबुआ) येथील असून याला झाडावर चढवलं. हा बालकामगार झाडाची फांदी तोडत असताना हायटेन्शन विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. महत्वाचं म्हणजे ही कंपनी शहापूर तालुक्यात असून कंपनीपासून शहापूर उपजिल्हा रूग्णालय जवळ असताना देखील हे प्रकरण लपविण्यासाठी मृतदेह पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात घेऊन गेले. तर याबाबत वाडा पोलिसांकडून अधिक तपास करून झीरो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाकरिता शहापूर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं आहे.
दुचाकीला चिरडले, दोघांचा मृत्यू, २ जखमी
नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी तालुक्यातील काटोल मार्गावरील चक्री घाटात शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत पहिल्या दुचाकीवरील मंगेश शंकर खाडे (वय ३७) आणि पवन सुनील सेंबेकर (वय २३, दोघेही रा. पोरगव्हाण, जि. अमरावती) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील आकाश वासुदेव जवणे (वय ३२) आणि गौतम श्रावण बागडे (वय २४, दोघेही रा. जलालखेडा, ता. नरखेड) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात चक्री घाटातील वळणावर घडला. ट्रकचालकाने बेपर्वाईने वाहन चालवत विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकींना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, पहिल्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.