धक्कादायक! मंत्री आदिती तटकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

Aditi Tatkare PRO Ashish Mete sudden death : मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयात PRO म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय आशिष मेटे यांचा मुंबईतील भांडुप येथे अचानक मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा आहे.
Aditi Tatkare’s PRO Ashish Mete Dies
Aditi Tatkare’s PRO Ashish Mete DiesSaam TV
Published On

Aditi Tatkare’s PRO Ashish Mete Dies : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून कार्यरत असणाऱ्या आशिष मेटे (वय ३० वर्षे) यांचा मुंबईतील भांडुप भागात अचानक दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवघ्या ३० व्या वर्षी आशिष मेटे यांच्या झालेल्या अकाली निर्धनाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष मेटे हे मुंबईतील भांडुप परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज आटोपून ते घरी परतले होते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर ते झोपण्यासाठी गेले, मात्र थोड्याच वेळात त्यांची प्रकृती अचानक अस्वस्थ झाली आणि त्यांना त्रास होऊ लागला. तब्बेत खालावल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

Aditi Tatkare’s PRO Ashish Mete Dies
मुंबईच्या २४ वर्षीय स्टार बायकरचा मृत्यू, १००० किमी दूर झाला भयंकर अपघात; बातमी ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का

मृत्यूचे कारण अस्पष्ट:

आशिष मेटे यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Aditi Tatkare’s PRO Ashish Mete Dies
1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

आशिष मेटे हे गेल्या काही काळापासून मंत्री आदिती तटकरे यांच्या जनसंपर्काचे आणि माध्यमांशी समन्वयाचे काम पाहत होते. आपल्या मनमिळाऊ आणि संयमी स्वभावामुळे त्यांचा राजकीय वर्तुळात आणि पत्रकार मित्रांमध्ये चांगला संपर्क होता. त्यांच्या या अचानक जाण्याने तटकरे यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com