Mother killed child : आधी पोटच्या मुलाचा जीव घेतला, नंतर स्वत:लाही संपवलं; पालघरमध्ये खळबळ

Mother killed child in Palghar : पालघरमध्ये महिलेने पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. पालघरच्या जव्हारमधील घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
आधी पोटच्या मुलाचा जीव घेतला, नंतर स्वत:लाही संपवलं; पालघरमध्ये खळबळ
Mother killed child Saam tv
Published On

फैय्याज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

पालघर : पालघरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरच्या जव्हार तालुक्यात एका मुलाने जन्मदातीच वैरी बनली आहे. जव्हार तालुक्यात एका महिलेने पोटच्या मुलाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जव्हार गरदवाडी गावात खळबळजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमधील गरदवाडी गावात पोटच्या मुलाची हत्या करून आईची आत्महत्या केल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना जव्हार तालुक्यातील गरदवाडी गावात घडली आहे. या महिलेचे आत्महत्याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

आधी पोटच्या मुलाचा जीव घेतला, नंतर स्वत:लाही संपवलं; पालघरमध्ये खळबळ
Pune Porsche Car Accident: डॉ. अजय तावरेंच्या अडचणी वाढणार, विशाल अग्रवालने दिलेल्या रक्कमेपैकी १ लाख कुठे गेले?

२३ वर्षीय लक्ष्मी प्रकाश भांबेरे या महिलेने पोटच्या ३ वर्षीय मुलाची हत्या केली. अन्वेश प्रकाश भांबेरे असे या मुलाचे नाव आहे. मुलाचा जीव घेतल्यानंतर आईनेही घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारच्या वेळी गरदवाडी गावात ही घटना घडली आहे.

या आहत्मत्या केलेल्या महिलेचा नवरा आणि महिलेचे सासरे हे दोघेही शेतीच्या कामाला गेले होते. संध्याकाळी शेतातून आल्यावर त्यांची पायाखालची वाळू सरकली. या घटनेनंतर जव्हार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी पंचनामा करून त्या दोघांची प्रेत त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.

जव्हार पोलिसांच्या म्हण्यानुसार, मुलाची हत्या आणि स्वतःची आत्महत्या का केली, ते कारण अजूनही कळाले नाही. पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आधी पोटच्या मुलाचा जीव घेतला, नंतर स्वत:लाही संपवलं; पालघरमध्ये खळबळ
Navapur Crime News : आठवडे बाजारातच पतीकडून पत्नीवर शस्त्राने हल्ला करीत खून; भर दुपारी घडलेल्या घटनेने खळबळ

पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या

पुण्यात कुख्यात गुंड राजू शिवशरण याची मध्यरात्री दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री टोळक्यांकडून राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून केला. राजू शिवशरण हा रामटेकडी परिसरातील कुख्यात गुंड आहे. राजू शिवशरण हत्या प्रकरणात वानवडी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास रामटेकडीतील राजू शिवशरण्याचा पाठलाग करून त्याची हत्या केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com