Mumbai Local Train : लोकलच्या गर्दीचा आणखी बळी! डोंबिवली-कोपरदरम्यान ITI च्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू

student dies in Train Accident लोकलच्या गर्दीने आणखी एक बळी घेतला आहे. डोंबिवली-कोपरदरम्यान ITIच्या विद्यार्थ्याचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे.
Local Train Accident
Local TrainSaam tv
Published On

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

डोंबिवली : रेल्वे प्रशासनाने लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल ट्रेन थांबवण्याचा निर्णय घेतलाय. तरीही मध्य रेल्वेवरील गर्दी कमी झालेली दिसत नाहीये. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानंतर प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. अशाच प्रवाशांनी भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा लोकल गर्दीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने वाढते अपघात लक्षात घेता कळवा आणि मुंब्रा दरम्यान काही लोकल ट्रेनला थांबा देण्याचा निर्णय घेतला. रेल्वे प्रशासनाने ५ ऑक्टोबरपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानंतरही लोकल गर्दीतून पडून प्रवाशांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरु आहे.

Local Train Accident
Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खूशखबर! १५ डब्यांची लोकल धावणार, कधी आणि कुठे? जाणून घ्या

डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान एकाचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकलमधील गर्दीमुळे विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झालाय. आयुष दोषी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आयुष हा आयटीआयचा विद्यार्थी होता. आयुषच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा पुढील तपास डोंबिवली जीआरपी पोलिसांनी सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

20 वर्षीय आयुष हा आपल्या कुटुंबासह डोंबिवली पश्चिम सम्राट चौक येथे राहत होता. मुलुंड येथे आयुष हा आयटीआय शिकत होता. आज आयुषने नेहमीप्रमाणे सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने जाणारी 8 वाजून 15 मिनिटांची फास्ट लोकल पकडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. गर्दीमुळे लोकलमध्ये आत शिरण्यास जागाच मिळाली नसल्याने तो दरवाजावर उभा होता. मात्र याचदरम्यान त्याचा तोल गेल्याने लोकलमधून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.

पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भांडुप-नाहूर स्थानकादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. लोकलमधून पडून मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरु केला होता. अमित ज्ञानेश्वर गोंदके असे या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव होतं. अमित हे अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाणे येथून आपली ड्युटी संपवून डोंबिवलीला निघाले होते. मात्र, ते धावत्या लोकलमधून पडल्याने गंभीर जखमी झाले. अमित हे रात्रीच्या वेळी रुळावर जखमी अवस्थेत पडून राहिल्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांनी जीव गमावला.

Local Train Accident
Local Train : लोकल अपघातात १५ वर्षांत ४५००० जणांचा मृत्यू, रेल्वेची हायकोर्टात माहिती

कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्टेशनवर कोणत्या फास्ट लोकल ट्रेन थांबतात?

सकाळच्या सुमारास अंबरनाथवरून सीएमएमटीच्या दिशेने जाणारी फास्ट लोकल कळव्याला सकाळी ८.५६ वाजता थांबते.

आसनगावहून सीएसएमटीच्या दिशेने धावणार फास्ट लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकावर ९.२३ वाजता थांबते.

संध्याकाळच्या सुमारास सीएसएमटीवरून बदलापूरला जाणारी लोकल कळवा रेल्व स्थानकावर सांयकाळी ७.२९ वाजता थांबते.

सीएमएमटीवरून टिटवाळ्याला जाणारी फास्ट लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकावर सांयकाळी ७.४७ वाजता थांबते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com