Mumbra Bypass Collapse Crack: मुंबईत मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना; मुंब्रा बायपासजवळ कोसळली दरड, बचावकार्यास यश

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील मुंब्रा देवी मंदिराजवळी मुंब्रा बायपास रोडवर रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
Mumbra Bypass Collapse Crack
Mumbra Bypass Collapse CrackSaam TV

Mumbra Bypass News: मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने दमदार बॅटींग सुरु केली आहे. शनिवारपासून काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना देखील वाढत आहेत. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील मुंब्रा देवी मंदिराजवळील मुंब्रा बायपास रोडवर रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर दरड हटवण्यात आली आहे. दरड कोसळल्यामुळे ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक काही काळ धीम्या गतीने सुरु होती.

Mumbra Bypass Collapse Crack
Nashik Crime News : विधाते गल्लीत गळा चिरुन विवाहितेची हत्या, पतीसह 10 ते 12 जण पाेलिसांच्या ताब्यात

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्रा येथील मुंब्रा देवी मंदिराजवळ तसेच हनुमान मंदिरा समोरील बाजूस मुंब्रा बायपासवर दरड कोसळल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दरड बाजूला करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

घटनेच्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे डोंगराचा काही भाग ढासळला आणि दरड (Crack) कोसळल्याची घटना घडली आहे. ही दरड कोसळल्याने मुंब्रा (Mumbra) बायपासवर दगड व मातीचा मोठा ढिगारा जमा झाला होता. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवान यांनी एका जेसीबीच्या सहाय्याने हा ढिगारा बाजूला केला आहे. तसेच मुंब्रा बायपास मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलाय.

Mumbra Bypass Collapse Crack
Pune Crime News: माहेरी गेलेल्या पत्नीवर पतीसह ५ मित्रांकडून सामूहिक अत्याचार, पुण्यातील संतापजनक घटना

ठाण्यात ३५ फुटांची भिंत चाळीवर कोसळली

दरम्यान ठाण्यातही काल भिंत कोसळल्याची घटना घडली होती. ठाण्यातील चिरागनगर परिसरात एका कॉम्पलेक्सची संरक्षण भिंत चाळीवर कोसळल्याची घटना घडली. 35 फूट लांब आणि 8 फूट उंच असणारी ही संरक्षण भिंत शेजारच्या चाळीवर कोसळली होती. या घटनेत गणेश बेंडकुळे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच ठाणे (Thane) महापालिकेचे आपती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com