Nashik Crime News : विधाते गल्लीत गळा चिरुन विवाहितेची हत्या, पतीसह 10 ते 12 जण पाेलिसांच्या ताब्यात

या घटनेचा नाशिक शहर पाेलिस तपास करीत आहेत.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam tv

- तबरेज शेख

Nashik News : नाशिक शहरातील सातपूर परिसरात असलेल्या विधाते गल्लीत एका महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी महिलेच्या पतीसह दहा ते बारा जणांना ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

Nashik Crime News
Pandharpur News : भाविकांनाे ! आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई मंदिरात 'ही' दर्शन सेवा राहणार बंद

नाशकातील (nashik) विधाते गल्लीत राहत्या घरात अशोक्तीबाई बैग यांचा गळा चिरून हत्या करण्यात आली. त्या मूळच्या मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती कळताच परिसर हादरुन गेला. पाेलिसांना घटनेची माहिती समजताच नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी तसेच सातपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Nashik Crime News
Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गंभीर आराेप; बेमुदत उपाेषणास प्रारंभ

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच पाेलिसांनी याप्रकरणी महिलेच्या पतीसह 10 ते 12 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या महिलेच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असून महिलेचा पती एका कारखान्यात कामाला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com