Yavatmal News : दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; वणी पोलीस ठाण्यात खळबळ

Yavatmal News : यवतमाळच्या वणी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी स्वाती कुटे यांना निलंबित केले आहे.
Yavatmal News
Yavatmal NewsSaam tv
Published On

संजय राठोड
यवतमाळ
: यवतमाळच्या वणी पोलीस ठाण्यातील कार्यरत महिला पोलिस कर्मचारीसह पोलिस शिपायाचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहेत. वाहनावरील दंडाची रक्कम स्वतःच्या फोन पे वर घेतल्याचा ठपका महिला कर्मचाऱ्यांवर आहेत. तर मटका जुगार व्यवसायिकांसोबत संबंध ठेवल्याचा आरोपावरून पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.

यवतमाळच्या (Yavatmal News) वणी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी स्वाती कुटे यांना निलंबित केले आहे. स्वाती कुटे यांनी दुचाकी वाहनावरील दंडाची रक्कम स्वतःच्या फोन पे वर घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शहरातील इंदिरा चौकातील रहिवासी आदर्श गुरुफुडे यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. २६ सप्टेंबरला शहरातील श्याम टॉकीज परिसरात (Police) पोलीस कर्मचारी सागर सिडाम यांनी त्यांची मोटरसायकल पकडून वणी पोलीस ठाण्यात नेली.

Yavatmal News
Lightning Strike : वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू; गुरे चारण्यासाठी गेली असताना घडली घटना

दुचाकी चलान करायचे आहे म्हणून एसआय स्वाती कुटे हिने आदर्श गुरुफुडे याला तिच्या फोनपेवर एक हजार रुपये टाकायला सांगितले. याचवेळी कुटे यांनी वाहतूक पोलिसांना बोलवून पाचशे रुपयांचे चलान फाडायला सांगितले. मात्र उर्वरित पाचशे रुपये तिने परत दिले नाही.  तक्रारदार यांनी पैसे परत मागितले असता, कुटे यांनी त्याला दम दिला. याची आदर्श गुरफुडे यांनी ३० सप्टेंबरला रजिस्ट्रेशन पोस्टद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार पाठवली. सोबतच स्वाती कुटे हिच्या फोनपेवर एक हजार रुपये पाठवल्याचे स्क्रीनशॉट व वाहतूक पोलिसांनी फाडलेल्या चलनाची प्रतही पाठवली. तक्रारीची शहानिशा करून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वाती कुटे यांना निलंबित केले.

Yavatmal News
Soyabean Price : बाजार समितीत सोयाबीनला आवक वाढली; नवीन व जुन्या सोयाबीनलाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

तर मटका, जुगार व्यवसायिकांसोबत संबंध ठेवल्याच्या आरोपावरून वणी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. या घटनेला आठवडा होत नाही; तोच पुन्हा सहाय्यक उपनिरीक्षक पदावरील महिला पोलिसांवर विलंबनाची कारवाई झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com