Pimpri Chinchwad News: महिलांशी गैरवर्तन करून सोनसाखळी चोरणाऱ्या २ चोरट्यांना अटक; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Pimpri Chinchwad Crime Branch: रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महिलाशी गैर वर्तन करून त्यांचे सोन्याचे दागिने बळजबरी चोरी करत असल्याचे समोर आले आहे.
Pimpri Chinchwad Crime News
Pimpri Chinchwad Crime NewsSaam tv
Published On

Pimpri Chinchwad Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातूनही अशीच एक घटना समोर आली असून महिलांशी गैरवर्तन करून त्यांच्या सोनसाखळी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा चार पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. (Crime News In Marathi )

Pimpri Chinchwad Crime News
Mother and Son Viral Video: आईचा मेकअप पाहून पोरानं ओळखलंच नाही; रडून रडून पार्लर घेतलं डोक्यावर

याबाबत अधिक माहिती अशी की, महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्या घेतले आहे. बुद्धदेव विष्णू बिश्वास आणि मिटू मिहीर बिश्वास मुळ राहणार पश्चिम बंगाल अशा अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीचे नाव आहेत. या दोन्ही आरोपीकडून पिंपरी चिंचवड शहर पोलिसाचा गुन्हे शाखा चार पोलीस पदकाने जबरी चोरीचे एकुण सात गुन्हे उघडकीस आणले आहेत.

बुद्धदेव विष्णू बिश्वास आणि मिटू मिहीर बिश्वास हे दोन्ही अट्टल चोरटे पिंपरी चिंचवड शहरात राहून पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महिलाशी गैर वर्तन करून त्यांचे सोन्याचे दागिने बळजबरी चोरी करत असल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

Pimpri Chinchwad Crime News
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

मात्र हे दोन्ही आरोपी पिंपरी चिंचवड शहरात सारखं आपलं राहण्याच ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडण्याचा मोठा आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर होते. अखेर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा चार पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून, तसेच हिंजवडी परिसरात सापळा लावून या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com