Mumbai News: १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवकांना नेता निवडण्याची संधी; कुठे, कधी अन् कशी कराल मतदार यादीत नावात नोंदणी?

Mumbai News: आगामी निवडणुकीसाठी पात्र नवमतदरांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी आहे.
Mumbai news
Mumbai news Saam Tv
Published On

रुपाली बडवे

Mumbai News:

आगामी निवडणुकीसाठी पात्र नवमतदरांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी आहे. नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी आणि पूर्वीपासून नोंदी असलेल्या मतदारांना त्यांच्या जुन्या माहितीत काही बदल करायचे असल्यास 27 ऑक्टोंबर ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत करता येईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. (Latest Marathi News)

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या माहितीनुसार, ' नवमतदार हे 1 जानेवारी 2024 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण हवेत. तसेच 2024 या वर्षाच्या एप्रिल , जुलै , ऑक्टोंबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना देखील सदर कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी ऑनलाइनही करता येणार आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'राज्यात सध्या 40 % लोकांचे मतदार कार्ड आणि आधार कार्ड लिंक झाले आहेत. तर 18-19 नोव्हेंबर या कालावधीत महाविद्यालयीन विद्यार्थी , महिला , दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शिबिरे राज्यभर रबिविली जाणार आहेत. त्याचबरोबर 2-3 डिसेंबर या कालावधीत तृतीयपंथी , देह विक्री करणाऱ्या स्त्रिया,भटक्या विमुक्त जाती-जमाती यांच्यासाठी राज्यभर शिबिरे आयोजित केली जाणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

5 जानेवारी 2023 तारखेपर्यंत अंतिम मतदार यादीत एकूण मतदार संख्या 9 कोटी 2 लाख चौसष्ट हजार आठशे चौऱ्यात्तर इतकी होती. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 71.45 % इतकी होती. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या मतदार यादीत 9 कोटी 8 लाख बत्तीस हजार 263 एवढी आहे.

तर एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 71.41% आहे. यात 17, 03, 193 इतकी नवीन मतदार नोंदणी झाली. यातील 11 लाख 35 हजार आठशे चार एवढ्या मतदाराची नावे दुबार , मयत कायमस्वरूपी स्थलांतरित असल्याने वगळण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Mumbai news
Maharashtra IAS Officer Transfer List: राज्यातील 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली?

27 ऑक्टोंबर 2023 रोजी मतदार यादीत

पुरुष मतदार आकडेवारी 4 कोटी 73 लाख 69 हजार 664 आहे.

महिला मतदार आकडेवारी 4 कोटी 34 लाख 57 हजार 679 आहे.

तृतीयपंथीय समुदाय मतदार आकडेवारी 4920 आहे.

Mumbai news
Maharashtra Political News: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपच्या ट्विटचा अर्थ काय?

महाराष्ट्रात तरुण मतदारांची मतदानातील धक्कादायक निराशाजनक आकडेवारी

महाराष्ट्रात लोकसंख्येत 18-19 वयोगटाची टक्केवारी 3.76% ( 47 लाख 83 हजार 070) इतकी आहे. पण ऑक्टोंबर 2023 मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त 0.27% ( 3 लाख 48 हजार 691 ) एवढीच आहे.

20-29 या वयोगटाची लोकसंख्येतील आकडेवारी 20.38% ( 2 कोटी 59 लाख 29 हजार 206) इतकी आहे. पण ऑक्टोबर 2023 मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त 12.19 % (1 कोटी 55 लाख 11 हजार 376 ) एवढीच आहे.

निवडणूक आयोगाने एका व्यक्तीचे 1 पेक्षा अधिक ठिकाणी मतदान यादीत फोटो असणाऱ्यांची जास्तीचे मतदान यादीतले नाव बाद केले. 2022 मध्ये 14 लाख 90 हजार 460 नावे बाद केली. तर 2023 मध्ये 1135804 नावे बाद केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com