Maharashtra IAS Officer Transfer List: राज्यातील 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली?

Maharashtra IAS Officer Transfer List: राज्यातील शिंदे सरकारने आज चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.
Maharashtra IAS Officer Transfer List In Marathi
Maharashtra IAS Officer Transfer List In Marathi Saam TV
Published On

Maharashtra IAS Officer Transfer List:

राज्यातील शिंदे सरकारने आज चार आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. राज्यातील विविध विभागात कार्यरत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

या आदेशात आयएएस अधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह , राधाविनोद अरिबाम शर्मा, एस. राममूर्ती आणि अमन मित्तल यांच्या नावाचा सामावेश आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra IAS Officer Transfer List In Marathi
Onion Price: कांदा शेतकऱ्यांना रडवणार? कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

१) IAS सचिन्द्र प्रताप सिंह (2007) यांची यशदा, पुणे येथे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२) IAS राधाबिनोद अरिबम शर्मा (2012) मुख्य प्रशासक, सिडको, छत्रपती संभाजी नगर यांची Jt.MC, MMRDA मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

३) IAS एस. राममूर्ती (2013) Jt.MC, MMRDA, मुंबई यांची सचिव, फी नियामक प्राधिकरण, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

४) IAS अमन मित्तल (2015) यांची व्यवस्थापकीय संचालक, MPCL, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra IAS Officer Transfer List In Marathi
Maharashtra Political News: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपच्या ट्विटचा अर्थ काय?

सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या बदलीवरून राजकारण

दरम्यान, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या बदलीवरून राजकीय तापलं. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावरून बदली झाल्यानंतर हितसंबंध जपणे हाच या बदलीमागील हेतू आहे, असं म्हणत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी आरोप केला होता.

पीएमपीचे अध्यक्ष सचिन्द्र प्रताप सिंह यांची अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत बदली करण्यात आली आहे. सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या बदलीवरून काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी आणि भाजप नेते उज्ज्वल केसकर यांनी टीका केली. 'पीएमपीएमएल कडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्यामागे हेच कारण आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com