Satara Politics: साताऱ्यात मतदानापूर्वी जोरदार राडा, भाजप उमदेवाराच्या भावाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण

Satara ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या मतदानापूर्वीच साताऱ्यात राजकारण तापले आहे. भाजप उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली.
Satara Politics: साताऱ्यात मतदानापूर्वी जोरदार राडा, भाजप उमदेवाराच्या भावाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण
Satara PoliticsSaam Tv
Published On

Summary -

  • साताऱ्यात मतदानापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा

  • भाजप उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली

  • मारहाणीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संभाजी थोरात, सातारा

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकींसाठी उद्या मतदान होणार आहे. मतदानापूर्वी साताऱ्यात मोठा राजकीय राडा झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपच्या उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. साताऱ्यातील पाल जिल्हा परिषद गटातील ही घटना आहे.या प्रकरणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला आहे. या घटनेमुळे साताऱ्यात राजकारण तापले आहे.

Satara Politics: साताऱ्यात मतदानापूर्वी जोरदार राडा, भाजप उमदेवाराच्या भावाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण
Chandrapur Politics: वडेट्टीवार आणि धानोरकर वाद शिगेला,18 नगरसेवक दिल्लीला; महापौरपदाबाबत अंतिम निर्णय घेणार राहुल गांधी?

भाजपचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाबासाहेब चोरेकर यांचे नातू बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना मारहाण केली. देवदर्शनाहून परतताना ही मारहाण करण्यात आली. पाल जिल्हा परिषद गटात भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील राजकीय वाद या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे.

Satara Politics: साताऱ्यात मतदानापूर्वी जोरदार राडा, भाजप उमदेवाराच्या भावाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण
Maharashtra Politics : माझ्यासारखे २४२ आमदार आहेत, म्हणून तुझा मुख्यमंत्री, शिंदेंसेनेचे आमदाराचे विधान

बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना रस्त्यामध्ये गाठत मारहाण करण्यात आली. कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली. याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या घटनेनंतर बाळासाहेब साळुंखे चोरेकर हे तक्रार दाखल करण्यासाठी उंब्रज पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाले आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Satara Politics: साताऱ्यात मतदानापूर्वी जोरदार राडा, भाजप उमदेवाराच्या भावाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण
Maharashtra Politics: अजितदादा गेल्यावर तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, शरद पवारांना शह देण्यासाठी...; शिंदेंच्या नेत्याचा गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com