Beed Crime : बीडमध्ये अल्पवयीन मुलीचं जबरदस्ती लग्न, पोलिस पोहचताच नवरदेवाने ठोकली धूम, १०० जणांवर गुन्हा

Beed Child Marriage Crime News : बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह करताना पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच नवरदेव पळून गेला असून या प्रकरणी १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Crime : बीडमध्ये अल्पवयीन मुलीचं जबरदस्ती लग्न, पोलिस पोहचताच नवरदेवाने ठोकली धूम, १०० जणांवर गुन्हा
Beed Child Marriage Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • बीडमध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह उघड

  • पोलिसांची चाहूल लागताच नवरदेव फरार

  • १०० जणांवर गुन्हा दाखल

  • पोलीस तपास सुरु

माधव सावरगावे, बीड

बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र पोलिसांची चाहूल लागताच नवरदेवाने भर मंडपातून लग्न अर्धवट सोडून पळ काढला. याप्रकरणी १०० जणांवर गुन्हा दाखल झाला असून बालविवाहाला महाराष्ट्रात बंदी असून देखील अद्यापही छोट्या छोट्या गावात छुप्या पद्धतीने या घटना सर्रास सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जवळच्या कपिलधार येथील मंगल कार्यालयात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जातात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खात्री पटवण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले त्यावेळी विवाह सोहळा पार पडला होता, परंतु पोलीस आल्याचे पाहताच नवरदेवाने मात्र मंडपातूनच पलायन केले.

Beed Crime : बीडमध्ये अल्पवयीन मुलीचं जबरदस्ती लग्न, पोलिस पोहचताच नवरदेवाने ठोकली धूम, १०० जणांवर गुन्हा
Pune : 'मी महाराष्ट्र सोडून जाईन...', फेसबुक लाईव्ह करत परप्रांतीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर, Video व्हायरल

या सर्व प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. आता या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात वधू वराचे आई-वडील, जवळचे नातेवाईक, वराडी मंडळी यांच्यासह कपिलधार देवस्थानच्या विश्वस्तांसह १०० जणांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime : बीडमध्ये अल्पवयीन मुलीचं जबरदस्ती लग्न, पोलिस पोहचताच नवरदेवाने ठोकली धूम, १०० जणांवर गुन्हा
Today Weather News : राज्यात शेकोट्या विझल्या, उकाडा वाढला; किमान तापमान वाढीमुळे थंडी गायब; वाचा तुमच्या शहरात आजचे हवामान

बीड जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक असून हे रोखण्यासाठी पोलीस व सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करतात. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून पलायन केलेल्या नवरदेवाचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान महाराष्ट्रात बालविवाहाला बंदी असूनही ते होतात कसे? यावर प्रश्नउपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com