महायुतीत वादाची ठिणगी, तुमचा मुख्यमंत्री 242 आमदारांमुळे

Mahayuti Row Over Mlas Remark On Chief Minister: जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखामुळे महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलीय... शिंदेसेनेच्या आमदारानं नेमकं काय विधान केलं? भाजपने शिंदेंच्या आमदाराला काय इशारा दिलाय?
Shinde Sena MLA Suhas Babar’s statement during the Zilla Parishad election campaign triggers fresh tension within MahaYuti alliance.
Shinde Sena MLA Suhas Babar’s statement during the Zilla Parishad election campaign triggers fresh tension within MahaYuti alliance Saam Tv
Published On

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत खानापूरमध्ये शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या याचं विधानामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडलीय... सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत नेमकं काय विधान केलं ऐका... दरम्यान बाबरांच्या विधानावरून मित्रपक्ष भाजपच आक्रमक झालं. शिंदेंनी बाबरांना समज द्यावी, अन्यथा पहिली टर्म शेवटची ठरेल, असा इशारा मंत्री गिरीश महाजनांनी दिलाय...तर भाजपचे नेते आक्रमक झाल्यानंतर बाबरांनी सारवासारव केली.

सांगली जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्यात खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये भाजप विरुद्ध शिंदेसेना,अशी लढत होतेय.. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेंकांविरोधात अशाप्रकारे आक्रमक विधानं केली जातायत..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com