चहाविक्रीच्या कपामागील रुपया शिवरायांच्या गडकिल्ले संवर्धनासाठी; राजेंनी केले कष्टक-यांचे काैतुक

सहा जूनला किल्ले रायगडवर साजरा हाेणार शिवराज्याभिषेक सोहळा.
sambhajiraje chhatrapati receiving donation from tea stall owner in kolhapur for shivrajyabhishek program.
sambhajiraje chhatrapati receiving donation from tea stall owner in kolhapur for shivrajyabhishek program.saam tv
Published On

काेल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या गडकिल्ल्यांवर गेल्यानंतर अनेक वेळा हे किल्ले आपल्या महाराष्ट्राचे (maharashtra) वैभव असल्याने त्याची जाेपासना झाली पाहिजे अशी भावना मनात येते. त्यातूनच मग किल्ले (fort) संवर्धनाची कल्पना पुढे येते आणि त्यासाठी प्रयत्न सुरु हाेताे. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर लाेकसहभागातून सध्या किल्ले संवर्धनाचे काम सुरु आहे. या कामात आपला देखील खारीचा वाटा असावा या भावनेतून काेल्हापूरातील (kolhapur) एका चहा विक्रेत्याने चहाविक्रीच्या प्रत्येक कपामागे १ रुपया शिवछत्रपती महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी देण्याचा निश्चय केला आहे. (sambhajiraje chhatrapati latest marathi news)

कोल्हापूरातील राजारामपुरी शाखेत एका चहा विक्रेत्याच्या दुकानाचे उदघाटन माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांच्या हस्ते झाले. युवा पिढीने स्वतःचा व्यवसाय करावा, स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी त्यांनी उभारलेल्या उद्याेग व्यवसायाच्या शुभारंभ असताे अथवा कार्यक्रम त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मी नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहताे असे संभाजीराजे यांनी नमूद केले.

sambhajiraje chhatrapati receiving donation from tea stall owner in kolhapur for shivrajyabhishek program.
खासदार संभाजीराजे छत्रपतींच अखेर ठरलं

यावेळी संभाजीराजे यांना चहा विक्रेत्यांनी दुर्गराज रायगडवर सहा जूनला साज-या केल्या जाणा-या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मदत म्हणून चहा विक्रेत्याने विशिष्ट रकमेचा धनादेश सुपुर्द केला आहे. शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने संभाजीराजेंनी चहा विक्रेत्याच्या गडकिल्ले संवर्धानासाठी राबविलेल्या संकल्पनेचे काैतुक करुन त्यांचे ट्विट (tweet) करुन देखील आभार मानले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

sambhajiraje chhatrapati receiving donation from tea stall owner in kolhapur for shivrajyabhishek program.
लिलावतीतून बाहेर पडताच नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना दिले Open Challenge
sambhajiraje chhatrapati receiving donation from tea stall owner in kolhapur for shivrajyabhishek program.
Tarapur: विराज प्रोफाइल कंपनीतील राड्यात १९ पाेलीस जखमी; २७ कामगार अटकेत
sambhajiraje chhatrapati receiving donation from tea stall owner in kolhapur for shivrajyabhishek program.
Priyanka Mohite: साता-याच्या प्रियांका मोहितेची कंजनजंगा माेहिम फत्ते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com