कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) पुढील राजकीय भूमिका पुण्यात १२ मे रोजी जाहीर करणार आहेत. संभाजीराजे पक्षप्रवेशाऐवजी एकला चलो रे च्या भूमिकेत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाजीराजे काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचे लागले लक्ष लागले आहे. राजकारणात पुढं काय करायचं ते मी ठरवलं आहे. फक्त ते पुण्यात १२ मे रोजी जाहीर करणार आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. (Chhatrapati Sambhajiraje latest Marathi news)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांनी राज्यभर दौरे केले आहेत. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती राज्यात सध्या चर्चेत आहेत. त्यांची ३ मे रोजी राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपली आहे. काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पक्ष प्रवेशाचे सूचक विधान केल्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) भाजपच्या शिफारसीवरुन ११ जून २०१६ रोजी राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा खासदार झाले होते. त्यांनी मागिल पाच वर्षात भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमात जास्त उपस्थिती लावलेली नाही. त्यांनी मराठा आरक्षणा संदर्भात पंतप्रधान यांना वेळ मागितली होती, पण पंतप्रधानांनी वेळ दिली नसल्याचे अनेकदा म्हटले होते. ते मराठा आरक्षाचा चेहरा बनले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात त्यांचे पारडे जड झाले आहे.
संभाजीराजे छत्रपती काँग्रेसमध्ये आले तर त्यांचे स्वागत: सतेज पाटील
काही दिवसापूर्वी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्ष प्रवेशाचे सूचक वक्तव्य केलं होतं. संभाजीराजे आपली पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते काँग्रेसमध्ये (Congress) आले तर स्वागतच आहे, असं पाटील म्हणाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या.
राज्यातील आणि देशातील दोन्हीकडे काम करायला आवडतं. राजकारणात उतरायं हे आता निश्चित झालं आहे. राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे माझे संपर्क वाढले आहेत. मी राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. यामुळे ते आता राज्यात सक्रिय होणार की केंद्रात जाणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
Edited By- Santosh Kanmuse
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.