Love Triangle Crime : गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडने भरचौकात हत्या केली, तरूणावर सपासप वार, पाहा CCTV VIDEO

Love Triangle Turns Deadly: यवतमाळमध्ये प्रेम प्रकरणातून युवकाची निर्घृण हत्या झाली. सूरज घटाळे या २३ वर्षीय तरुणावर गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडने चार मित्रांसोबत मिळून चाकूने सपासप वार करत जीव घेतला.
Yavatmal Crime News
CCTV captures shocking murder of Suraj Ghatal in Yavatmal by girlfriend’s ex and his gang over a love affair dispute.Saam TV News
Published On

Shocking knife attack in Yavatmal caught on camera over love dispute : प्रेमात धोका मिळालेला व्यक्ती कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्याचाच प्रत्येक यवतमाळमध्ये आलाय. गर्लफ्रेंडनं ब्रेकअप केल्यानंतर संतापलेल्या तरूणाने चार मित्रांसोबत मिळून एकाचा भर चौकात हत्या केली. मुलगी ज्या तरूणासोबत प्रेम करत होती, त्याला रस्त्यात गाठत काटा काढला. ही हत्येची घटना कॅमेऱ्यात कैद झाली, याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यवतमाळमधील संकट मोचन रोडवर शुक्रवारी रात्री ९.२० वाजता प्रेम प्रकरणातून युवकाची निर्घृण हत्या झाली. सूरज घटाळे या २३ वर्षीय तरुणावर गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडने चार मित्रांसोबत मिळून चाकूने सपासप वार करत जीव घेतला. (Maharashtra love triangle murder video goes viral on social media)

यवतमाळमधील संकट मोचन रोडवर प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरज घटाळे असे मृत तरूणाचे नाव आहे. प्रियसीच्या एक्स बॉयफ्रेंडने मित्रांच्या मदतीने तरूणाचा काटा काढला. या हत्येच्या घटनेचा थरार प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. चाकूने वार करून शरीराची चाळणी केल्याचे व्हिडिओत दिसतेय.

Yavatmal Crime News
ST Bus : एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार? परिवहन मंत्र्यांकडून संकेत

यवतमाळमधील संकट मोचन रोडवर शुक्रवारी रात्री ९.२० वाजता एक्स बॉयफ्रेंडने मित्रांच्या मदतीने सूरज घटाळे याला चौकात गाठलं. त्याच्यावर एकत्र सर्वांनी हल्ला चढवला, सपासप चाकून वार करत रक्तबंबाळ केले. सूरज घटाळे याला बेदम मारहाण अन् सपासप चाकूने वार करत जीव घेतला. रस्त्यावर कुणीही नसताना एक्स बॉयफ्रेंडने सूरज घटाळे याचा काटा काढला. संकट मोचन रोडवरील घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.

Yavatmal Crime News
ST Bus : पंढरपूरला जाण्यासाठी तुमच्या गावात एसटी येणार, अट फक्त एकच

संकट मोचन रोडवर चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी तरूणाची हत्या केल्याचं समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. घटनास्थळाचा पंचनामा करत सूरज याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रूग्णालयात पाठवला. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जातोय.

Yavatmal Crime News
Pune : पुण्यात खळबळ, भाजपच्या पदाधिकाऱ्याकूडन महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याचा छळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com