Pune : पुण्यात खळबळ, भाजपच्या पदाधिकाऱ्याकूडन महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याचा छळ

BJP leader harassment case in Pune Municipal Corporation : पुणे महानगरपालिकेतील वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा भाजप पदाधिकारी ओंकार कदम यांच्याकडून फेब्रुवारीपासून मानसिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pune BJP official barred after harassment allegations surface : पुणे महानगरपालिकेतील वैद्यकीय महिला अधिकाऱ्याला भाजप पदाधिकारी ओंकार कदम यांच्याकडून फेब्रुवारीपासून छळ आणि दमदाटीचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेने प्रारंभी याकडे दुर्लक्ष केल्याने महिलेला महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी लागली. यानंतर जूनमध्ये महापालिकेने कारवाई करत कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना महापालिका आवारात प्रवेशबंदी घातली.

कदम यांनी मात्र आपली बाजू मांडताना सांगितले की, त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. यावर आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, "कदम यांचे भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, अन्यथा कदम यांच्यावर पोलिस तक्रार दाखल करू."

मात्र, फेब्रुवारीत तत्कालीन आयुक्त राजेश भोसले यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नव्हती. केवळ पोलिसांना गोपनीय पत्र पाठवले गेले. यामुळे भोसले आणि वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com