ST Bus : एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार? परिवहन मंत्र्यांकडून संकेत

Pratap Sarnaik : महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचे खासगीकरण होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे संकेत दिले आहेत.
ST Bus
ST BusSaam Tv
Published On

Maharashtra government to privatize ST bus stations under PPP model : महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचे खासगीकरण होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) जागांचा व्यावसायिक विकास करून उत्पन्नवाढीचा नवा मार्ग शोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये बसस्थानक आणि आगार परिसराचा समावेश असून, त्यांचा विकास सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध शहरांमध्ये बसस्थानक व बस आगार परिसर स्वरुपात जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा. यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात यावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

ST Bus
ST Bus : पंढरपूरला जाण्यासाठी तुमच्या गावात एसटी येणार, अट फक्त एकच

मुंबईतील एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयात आयोजित बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात आला. या अंतर्गत राज्यातील 72 पॅकेजेसमध्ये एसटीची शहरी, निमशहरी आणि ग्रामीण जागा मोडेलप्रमाणे समाविष्ट केली जाणार आहेत. जागांचे अ, ब आणि क वर्गांमध्ये वर्गीकरण करून त्याचे एकत्रित पॅकेज तयार केले जाणार आहे.

ST Bus
ST employees: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 53 टक्के महागाई भत्ता अन् ₹१००००००० अपघात विमा!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, ‘एसटी’च्या राज्यातील जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थिती, व्यावसायिक लाभ आदी बाबी लक्षात घेण्यात याव्यात. या जागांच्या विकासासाठी अ, ब आणि क असे वर्गीकरण करून त्यांचे एक पॅकेज करावे. ज्यामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण जागांचा समावेश असावा. पॅकेजमधील मालमत्तेचे मूल्य त्याच पॅकेजमध्ये असावे. राज्यात 72 पॅकेजेसमधून एसटी बसस्थानक, आगार आदींचा विकास करण्यात येणार आहे. पॅकेजमध्ये कामांबाबत सुधारणा करायची असल्यास सुधारणा करून घ्याव्यात. या कामाला गती देवून तातडीने या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com