ST Bus Pandharpur Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशी वारी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या भक्तीला समर्पित आहे. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पायी प्रवास करतात. त्याशिवाय एकादशीच्या आधी वारकरी अन् भाविक एसटी बस अथवा खासगी वाहनाने पंढरपूरकडे रवाना होतात. वारकरी आणि भाविकांसाठी एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरला जाण्यासाठी आता तुमच्या गावात बस पाठवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. पण त्यासाठी ४० जणांनी एसटीसाठी बुकिंग करणं गरजेच आहे. ४० जणांचे बुकिंग झाल्यानंतर एसटी तुमच्या दारात येणार असल्याची घोषणा केली. (Group Booking Scheme: Direct ST Bus to Pandharpur from Your Village)
परिवहन महामंडळाने वारकऱ्यांसाठी गटबुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जर एकाच गावातील 40 जणांचा एकाच वेळी बुकिंग केली असेल, तर बस त्यांच्या गावातून सोडली जाईल. एसटी या लोकांना घेण्यासाठी गावात जाईल. शिवाय दर्शनानंतर पंढरपूरहून त्यांना त्यांच्या गावी परत सोडेल. यामुळे, एसटीने घराच्या दारातून थेट पंढरपूरला जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एसटी प्रशासनाने या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
आषाढी वारीसाठी पुण्याहून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पुणे ते पंढरपूर प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. या भाविकांच्या प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातून ७०० बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बसेस पुणे विभागातील 14 डेपोंमधून चालवल्या जातील. ६ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या काही दिवस आधीपासून या सेवेला सुरुवात होईल.
७०० बसेसपैकी ३५० बसेस पुणे विभागातूनच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, तर उर्वरित 350 बसेस मुंबई विभाग आणि विदर्भातून मागवण्यात आल्या आहेत. यामुळे यंदा पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना एसटी बसेसच्या कमतरतेचा सामना करावा लागणार नाही, असा दावा एसटी प्रशासनाने केला आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व १४ डेपोंमधून बसेसची संख्या वाढवण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.