ST Bus : आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सूट, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

Transport Minister Pratap Sarnaik : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुरुषांना १५% सवलतीची घोषणा केली आहे. फ्लेक्सी फेअर योजना जुलैपासून लागू होणार असून, ई-शिवनेरीसारख्या प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.
St Bus
St BusSaam tv
Published On

Pratap Sarnaik News Update : एसटीच्या प्रवासात आता पुरूषांनाही विशेष सवलत मिळणार आहे, याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त बोलत होते. एसटीच्या प्रवाशांना (special concession in ST travel) दर्जेदार सुविधा देण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी रविवारी घोषणा केली. त्यानुसार आता महिलाच नव्हे तर पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलत मिळणार आहे. त्यासाठी नेमकी

एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सवलत देण्याची घोषणा यावेळी प्रताप सरनाईक यांनी केली. कमी गर्दी असणाऱ्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी, त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत देण्याची घोषणा सरनाईक यांनी केली. फ्लेक्सी फेअर असं या योजनेचं नाव असेल. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे.

St Bus
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात मेगाभरती! मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

फ्लेक्सी फेअर योजना नेमकी काय आहे ?

जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च यादरम्यान एसटीने प्रवास करणार्‍यांची संख्या कमी असते. प्रवाशांची संख्या कमी असली, तरी एसटीला खर्च तितकाच येतो. त्यामुळे फ्लेक्सी फेअर योजना या काळात लागू केल्यास एसटी महामंडळाला मोठा फायदा होऊ शकतो, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे ही योजना एसटीसाठी फायद्याची ठरेल, असे सांगण्यात येतेय.

तिकिटामध्ये किती कपात होणार ?

समजा, दादर ते स्वारगेट यादरम्यान ई शिवनेरी बसचे तिकिट ६०० रूपये आहे. जर गर्दी कमी असणाऱ्या हंगामात तुम्ही आधीच तिकिट बुक केले. तर हे तिकिट तुम्हाला ५१० रूपयांना मिळेल.

St Bus
ST कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार, प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com