ST कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार, प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा

Pratap Sarnaik announcement : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५३ टक्के होण्याची शक्यता आहे, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या महिन्यात निर्णय होणार आहे.
Maharashtra ST employees
dearness allowance hike ST employees MaharashtraSaam TV News
Published On

सचिन कदम

dearness allowance hike ST employees Maharashtra : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून खुशखबर मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होईल, अशी घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५३ टक्के होण्याची शक्यता आहे. माणगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली. सरनाईकांच्या घोषणेनंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या संदर्भातील मागणीवर याच महिन्यात मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिलं. महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला माणगाव इथं सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५३ टक्के करावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. एसटीच्या ताफ्यात दरवर्षी 5 हजार याप्रमाणे ५ वर्षात २५ हजार नवीन लालपरी बसेस दाखल होतील , असंही सरनाईक यांनी सांगितलं.

Maharashtra ST employees
Pune Crime : नवरा मध्यरात्री राक्षस झाला, बायकोला गळा दाबून संपवले, मृतदेह दुचाकीवर नेताना बिंग फुटले

ड्युटी संपल्यावर घरी जाऊन एकच्या जागी दोन तीन चपटी घ्या - गोगावले

मोबाईलवर बोलत किंवा नशापान करून गाडी चालवल्यामुळे अपघात होतात. हे टाळण्यासाठी ड्युटी संपल्यावर घरी जाऊन एकच्या जागी दोन तीन चपटी घ्या, असा अजब सल्ला मंत्री भरत गोगावले यांनी एसटीच्या चालकांना दिला आहे. मोबाईलवर बोलताना गाडी बाजूला उभी करा, मोबाईलवर बोलणं पूर्ण करा मग पुढं जा, असही त्यांनी सुचवलं. भरत गोगावले यांच्या विधनाची चर्चा जोरदार सुरू आहे.

Maharashtra ST employees
India Pakistan Tension : पाकिस्तान तोंडावर पडला, मदत मागायला गेला पण संयुक्त राष्ट्राने फटकारले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com