शेतकऱ्यावर काळाचा घाला! मध्यरात्री शेतात घडलं भयंकर; सकाळी मृतदेह सापडला

Young Farmer Electrocuted Irrigation Chhatrapati Sambhajinagar: पैठण तालुक्यातील लाखेगाव येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या २९ वर्षीय शेतकऱ्याचा विद्युत धक्का लागून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
A tragic scene from Lakhgaon village where a young farmer lost his life due to electrocution while irrigating his field at night.
A tragic scene from Lakhgaon village where a young farmer lost his life due to electrocution while irrigating his field at night.Saam Tv
Published On

माधव सावरगावे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर: पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाणे हद्दीतील लाखेगाव येथे शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका नवतरुण शेतकऱ्याचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून रविवारी (ता. ५) पहाटे हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

A tragic scene from Lakhgaon village where a young farmer lost his life due to electrocution while irrigating his field at night.
Yavatmal Crime: शेजाऱ्याच्या घरातील पोत्यात आढळला बेपत्ता ७ वर्षीय मुलीचा मृतदेह |Video

जमिल उमर शेख (वय २९, रा. अलीपुर, लाखेगाव) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमिल शेख हे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या शेतातील गट क्रमांक ४२ मध्ये कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत.

A tragic scene from Lakhgaon village where a young farmer lost his life due to electrocution while irrigating his field at night.
Kharat Case : भोंदू खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी 'अघोरी' विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी

रविवारी पहाटे त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता ते शेतातच मृत अवस्थेत आढळून आले. शेजारील गट क्रमांक ०५ मध्ये मका पिकाभोवती तारेचे कुंपण करून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. अंधारात काम करत असताना त्या कुंपणाचा स्पर्श झाल्याने जमिल शेख यांना जोराचा विद्युत धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

A tragic scene from Lakhgaon village where a young farmer lost his life due to electrocution while irrigating his field at night.
Baramati bypoll : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात ३ जण लढणार, कुणी कुणी भरला उमेदवारी अर्ज?

घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नातेवाईकांच्या मदतीने जमिल शेख यांना ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. आस्मा यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com