संजय राठोड
यवतमाळ : घरात महिलाच असताना दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला. महिलांना शास्त्राचा धाक दाखवत घरात असलेली ३० लाखाची राख रक्कम व माहिजवळील दागिने घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे.
यवतमाळच्या (Yavatmal) महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथून अतिदुर्गम भागात तीन किमी अंतरावर असलेल्या गोकुळवाडी येथील संतोष पांडे यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास हा सशस्त्र दरोडा पडला. यावेळी घरातील महिलांवर शस्त्राने वार करीत दरोडेखोरांनी तीस लाख रुपये रोख आणि १७ तोळे सोन्याचे (Gold) दागिने लुटून नेल्याची घटना घडली. या घटनेची माहिती वाऱ्या सारखी पसरली.
पोलिसांचा पाच पथक गठीत
दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक आणि उमरखेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. (Robbery) दरोड्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पोलिसांचे वेगवेगळे पाच पथक गठीत केले असून सायबर सेलची मदत घेऊन गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.