Dhule Accident : भरधाव कार दुभाजकावर धडकली; चार जण गंभीर जखमी

Dhule News : रात्रीच्या वेळी हा दुभाजक दिसला नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान हा अपघात
Dhule Accident
Dhule AccidentSaam tv

धुळे : भरधाव वेगाने निघालेली कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडकली. यामुळे झालेल्या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात धुळे शहरातील बारा पत्थर परिसरात रात्रीच्या सुमारास घडला.  

Dhule Accident
Kalyan Crime News : फुटपाथवरून सहा महिन्याच्या चिमुरड्याचे अपहरण; बारा तासात पोलिसांकडून गुन्ह्याची उकल

धुळे (Dhule) शहरातील बारा पत्थर परिसरातून भरधाव कार चाळीसगावच्या दिशेने निघाली होती. हि कार बारा पत्थर परिसरात असलेल्या दुभाजकाला जोरात धडकल्याने कारमधील तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहे, रात्रीच्या वेळी हा दुभाजक दिसला नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान हा (Accident) अपघात झाला.  

Dhule Accident
Parali News : पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी परळी बंद; शहरात काढण्यात आली रॅली

अपघातात झालेल्या जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असून जखमींना तातडीने परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. बारा पत्थर परिसरातील हा दुभाजकावर रेडियम लावण्यात आले नसल्याने रस्तावरील दुभाजक लवकर लक्षात येत नसल्याने जीवघेणा ठरत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com