Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, आईसह २ मुलींचा मृत्यू; यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार

Yavatmal Heavy Rain Flood Tragedy : यवतमाळ जिल्ह्यातील दहेली पुलावरून पुराच्या पाण्यात अर्टिगा कार वाहून गेल्याने आई आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
YAVATMAL FLOOD TRAGEDY: THREE DEAD AFTER ERTIGA CAR SWEPT AWAY IN HEAVY RAINS | MAHARASHTRA RAIN NEWS
YAVATMAL FLOOD TRAGEDY: THREE DEAD AFTER ERTIGA CAR SWEPT AWAY IN HEAVY RAINS | MAHARASHTRA RAIN NEWS AI
Published On
Summary
  • यवतमाळच्या दहेली पुलावर पुराच्या पाण्यात अर्टिगा कार वाहून गेल्याने आई आणि दोन मुलींचा मृत्यू

  • चालक अविनाश खंडारे यांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले

  • विदर्भात मुसळधार पावसामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणाली विदर्भाकडे आल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज विदर्भातील जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर पाहता सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात पावसाने रौद्र रूप धारण केले असून नद्या तुडुंब वाहत आहेत. काही नद्यांना पूर आला असून जिल्ह्यातील दारव्हा मार्गावरील दहेली पुलाजवळ मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. पुराच्या पाण्यात एक अर्टिगा कार वाहून गेली. या कारमधील तिघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुसळधार पावसामुळे दहेली पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. अशा परिस्थितीत अर्टिगा कार पुल ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना ती अचानक पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेली. कारमध्ये चालक अविनाश खंडारे, त्यांची पत्नी माधवी खंडारे आणि त्यांच्या दोन मुली प्रवास करत होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

YAVATMAL FLOOD TRAGEDY: THREE DEAD AFTER ERTIGA CAR SWEPT AWAY IN HEAVY RAINS | MAHARASHTRA RAIN NEWS
Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

पहाटेच्या सुमारास अथक प्रयत्नांनंतर चालक अविनाश खंडारे यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यांच्यावर तत्काळ रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. मात्र पत्नी माधवी आणि दोन्ही मुली पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्याने सकाळपासून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. बचाव पथक, पोलीस, स्थानिक स्वयंसेवक आणि नागरिकांच्या मदतीने नदीपात्र व आसपासच्या परिसरात सखोल शोध घेण्यात आला.

YAVATMAL FLOOD TRAGEDY: THREE DEAD AFTER ERTIGA CAR SWEPT AWAY IN HEAVY RAINS | MAHARASHTRA RAIN NEWS
Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर तिघांचाही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पूरस्थितीत वाहत्या पाण्यातून किंवा पुलांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामानाचा इशारा लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचेही प्रशासनाने सांगितले असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com