Worms found in food : प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ; दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसच्या जेवणात अळ्या

Worms found in food at express train : प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरुच असल्याचं समोर येत आहे. दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसच्या जेवणात अळ्या आढळल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ; दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसच्या जेवणात अळ्या
Worms found in foodSaam tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी पुण्यात एका कॅडबरीमध्ये अळ्या आढळून आल्या होत्या. कॅडबरी खात असताना चक्क कॅडबरीत अळ्या दिसल्या होत्या. या अळ्या असलेल्या कॅडबरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा प्रकार ताजा असताना राजधानी एक्स्प्रेसमधील जेवणात अळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर प्रवाशांकडून रेल्वे विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

राजधानी एक्सप्रेसमधील अन्नात अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी सकाळी राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाष्टा आणि जेवणात अळ्या मिळाल्या आहेत. या किळसवाण्या प्रकारामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारानंतर प्रवाशांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ; दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसच्या जेवणात अळ्या
Kolhapur News: 'मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शरद पवारांसोबतच्या नात्यांचा सौदा', समरजितसिंह घाटगेंची मुश्रीफांवर जहरी टीका

काही प्रवासी राजधानी एक्स्प्रेसमधून दिल्लीहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. दिल्लीमधून मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांनी सकाळी नाष्ट्यासाठी पोहे मागितले होते. या प्रवाशांनी सकाळी मागितलेल्या पोह्यांमध्ये अळ्या आढळल्या. या प्रवाशांनी हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर मागवलेलं जेवणही निकृष्ट दर्जाचं होतं. या किळसवाणा प्रकार समोर येताच प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. भरमसाठ प्रवास भाडे असणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस मध्ये निकृष्ट अन्न मिळाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ; दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसच्या जेवणात अळ्या
Karad Latest News : भंगार गोळा करणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा! गणरायाच्या गळ्यातील लाखोंची सोन्याची माळ केली परत

कॅडबरीमध्ये आढळल्या अळ्या

पुण्यात एका व्यक्तीने मागवलेल्या कॅडबरीमध्ये अळ्या आढळल्या होत्या. कॅडबरीमध्ये अळ्या आढळल्यानंतर या व्यक्तीने कंपनीवर एकच संताप व्यक्त केला होता. त्यानंतर या व्यक्तीने कंपनीला फोन करून या प्रकाराचा जाब विचारला होता. मात्र, कंपनीने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती. पुण्यातील या व्यक्तीने टोल फ्री क्रमांकावर कॉल केला होता. कॉलनंतर कंपनीने रॅपर आणि कॅडबरी आपल्याकडे आहे का? अशी विचारणा केली. असं या व्यक्तीने सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com