Kolhapur News: 'मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शरद पवारांसोबतच्या नात्यांचा सौदा', समरजितसिंह घाटगेंची मुश्रीफांवर जहरी टीका

Samarjitsingh Ghatge On Hasan Mushrif: समरजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा लढवणार असून कागलममध्ये ते हसन मुश्रीफ यांना आव्हान देणार आहेत.
Kolhapur News: 'मंत्रीपदाच्या तुकड्यासाठी शरद पवारांसोबतच्या नात्यांचा सौदा', समरजितसिंह घाटगेंची मुश्रीफांवर जिव्हारी लागणारी टीका
Samarjitsingh Ghatge On Hasan Mushrif:Saamtv
Published On

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. २६ सप्टेंबर

Samarjitsingh Ghatge Vs Hasan Mushrif: शरद पवार साहेब हे हसन मुश्रीफ यांना आपल्या चिरंजीवा प्रमाणे वागवायचे, सुप्रिया ताई त्यांना मोठ्या भावा प्रमाणेच राखी बांधायच्या. मात्र हसन मुश्रीफ यांनी ईडी आणि पालकमंत्री पदासाठी नात्यांचा सौदा केला, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे. कागल इथं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात समरजीत सिंह घाटगे बोलत होते. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Kolhapur News: 'मंत्रीपदाच्या तुकड्यासाठी शरद पवारांसोबतच्या नात्यांचा सौदा', समरजितसिंह घाटगेंची मुश्रीफांवर जिव्हारी लागणारी टीका
Maharashtra Politics: अर्थ खात्याचा विरोध डावलून बावनकुळेंच्या संस्थेला भूखंड, चर्चा न करताच सरकारचा निर्णय; 'मविआ'चे नेते संतापले

काय म्हणाले समरजितसिंह घाटगे?

"शरद पवार साहेब हे हसन मुश्रीफ यांना आपल्या चिरंजीवा प्रमाणे वागवायचे, सुप्रिया ताई त्यांना मोठ्या भावा प्रमाणेच राखी बांधायच्या. शरद पवारांनी कागल मध्ये येऊन सभा घेतली, सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये मेळावा घेतला. एक काळ होता की हे सर्व त्यांचं कुटुंब होतं, मात्र हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदासाठी शरद पवारांसोबतच्या नात्यांची डील केली. त्यांनी ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी नात्यांचा सौदा केला," अशी टोकाची टीका समरजितसिंह घाटगे यांनी केली आहे.

पालकमंत्रिपदासाठी सौदा..

तसेच "या सौद्यामुळे त्यांना सध्या रात्री झोप येत नाही. झोप येत नसल्यामुळे माझ्याबद्दल त्यांचे असे चुकीचे शब्द येत आहेत. नात्यांचा सौदा केल्याने त्यांना फस्ट्रेशन आलेला आहे आणि ते माझ्यावर काढत आहेत. महाविकास आघाडीने मला हृदयाने स्वीकारलेले आहे. माझ्याबद्दल सध्या ते अपशब्द वापरत आहेत पण ते अपशब्द का वापरतात? याचा विचार करणे गरजेचे आहे," असा सवाल समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित केला.

Kolhapur News: 'मंत्रीपदाच्या तुकड्यासाठी शरद पवारांसोबतच्या नात्यांचा सौदा', समरजितसिंह घाटगेंची मुश्रीफांवर जिव्हारी लागणारी टीका
Mumbai Crime News : रात्रीच्या वेळी दुचाकींचा पाठलाग करून लुटायचा; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात, सराईत चोरटा गजाआड

'एजंटगिरी खपवून घेणार नाही...'

"शासनाचे पैसे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे लोकशाही मार्गातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे काम असतं. ते कर्तव्य असतं, मग तुम्हाला शासनाचे पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं काम केल्यानंतर पावशेर ठेवायची आवश्यकता का वाटते? लाभार्थ्यांना कोणाच्या मिंती ठेवायचं नाही लाभार्थ्यांच्या डायरेक हातामध्ये पैसे गेले पाहिजेत असं नियोजन आपलं सरकार आल्यानंतर होणार आहे. कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा भागातील सर्व एजंटचे धंदे बंद पाडायचे आहेत. कुठलीही एजंटगिरी आणि खंडणीखोरपणा या विधानसभा मतदारसंघात मी खपवून घेणार नाही," असा इशाराही समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी दिला.

कागलमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ...

दरम्यान, भाजपला रामराम ठोकत समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतल्यानंतर कोल्हापूरचे राजकीय चित्र बदलून गेले आहे. समरजित घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा लढवणार असून कागलममध्ये ते हसन मुश्रीफ यांना आव्हान देणार आहेत. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघात घड्याळविरुद्ध तुतारी असा थेट सामना रंगणार आहे.

Kolhapur News: 'मंत्रीपदाच्या तुकड्यासाठी शरद पवारांसोबतच्या नात्यांचा सौदा', समरजितसिंह घाटगेंची मुश्रीफांवर जिव्हारी लागणारी टीका
Kolhapur Politics: कोल्हापुरात भाजपची ताकद वाढली, अमित शहा यांच्या उपस्थितीत बड्या नेत्याने केला BJP मध्ये प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com