Mumbai Crime News : रात्रीच्या वेळी दुचाकींचा पाठलाग करून लुटायचा; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात, सराईत चोरटा गजाआड

Mumbai News : रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बहिणीसोबत दुचाकीवरून घराकडे चालले होते. यावेळी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करून धमकावत फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळ्याची चैन घेऊन पळाला
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam tv
Published On

संजय गडदे 
मुंबई
: रात्रीच्या अंधारात वर्दळ नसलेल्या रस्त्यावर दुचाकींचा पाठलाग करून चैन स्नॅचिंग करण्याचा प्रकार अंधेरी पूर्वेकडील गुंदवली मेट्रोस्थानक परिसरात घडला होता. साधारण दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरी करणाऱ्या या आरोपीला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चैनसह दुचाकी जप्त केली आहे. 

अंधेरी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शम्स उर्फ जॉनी समीर इब्राहिम सय्यद (वय २७) असं युवकाचे नाव आहे. आरोपी हा (Mumbai crime News) सराईत गुन्हेगार असून पोलीस तपासात अंधेरी आणि विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. फिर्यादी अरुण गणेशन नडेशन  हे १३ सप्टेंबरला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बहिणीसोबत दुचाकीवरून घराकडे चालले होते. यावेळी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करून धमकावत फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळ्याची चैन घेऊन पळाला. यासंदर्भात फिर्यादींनी २१ सप्टेंबरला अंधेरी पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

Mumbai Crime News
Nandurbar News : दंगलीच्या व्हिडिओसह तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित; नंदूरबारमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल

१५० सीसीटीव्ही फुटेज तपासले 
पोलीस उपायुक्त परिमंडळ १० मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला शोधण्यासाठी तीन टीम तयार करण्यात आल्या. पथकाने सरकारी तसेच प्रायव्हेट १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज चेक करून व तांत्रिक मदतीने आरोपीची ओळख पटवली. आरोपी हा भाईंदर येथे राहत असल्याचे समजताच परिसरात पथक व महिला अमलदार यांनी सतत दोन दिवस सापळा लावून संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्हा कबूल केल्याने त्याला अटक केली. अधिक चौकशी केली असता विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजून एका गुन्ह्याची कबुली दिली. तसेच आरोपी हा शाळेत गुन्हेगार असून मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात १३ पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com