वंदे भारत एक्स्प्रेस
Vande Bharat TrainSaam Tv

Vande Bharat Train : राज्याला मिळाल्या ३ वंदे भारत एक्स्प्रेस; कोणत्या मार्गांवर धावतात, तिकिट किती? वेळापत्रक काय?

Maharashtra Three New Vande Bharat Trains : महाराष्ट्राला आता तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळालेल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार, स्थानके कोणते असतील याबाबत सविस्तर आपण जाणून घेवू या.
Published on

मुंबई : भारतीय रेल्वे वंदे भारत गाड्यांची संख्या सातत्याने वाढवत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन केलंय. त्यामुळे आता महाराष्ट्रातील वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या ११ झालीय. या नवीन एक्स्प्रेस नागपूर-सिकंदराबाद, कोल्हापूर-पुणे आणि पुणे-हुबळी या मार्गावर धावत आहेत.

यापूर्वी राज्यात आठ वंदे भारत एक्स्प्रेस धावत (Vande Bharat Train) होत्या. मुंबई-अहमदाबाद, मुंबई-गांधीनगर, मुंबई-मडगाव, मुंबई-सोलापूर, मुंबई-साईनगर शिर्डी, मुंबई-जालना, नागपूर-रायपूर आणि नागपूर-बिलासपूर या मार्गांसह पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेद्वारे या गाड्या चालवल्या जात होत्या. यामध्ये आता तीन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडली आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे.

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (Kolhapur To Pune) ही आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच बुधवार, शुक्रवार आणि रविवार धावते. ही एक्सप्रेस पुण्याहून दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी निघते आणि कोल्हापुरमध्ये सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचते. परतीच्या प्रवासात कोल्हापूरहून सकाळी सव्वा आठ वाजता निघते, पुण्यात दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोहोचते. कोल्हापूर-पुणे वंदे भारत मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर थांबा घेते.

पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस

पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस (Pune To Hubli) ही आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच गुरुवार, शनिवार आणि सोमवार धावते. ही एक्सप्रेस पुण्याहून दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी सुटते आणि हुबळी स्थानकावर रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी पोहोचते. परतीच्या प्रवासात गाडी हुबळी येथून पहाटे ५ वाजता निघते. पुण्यात दुपारी दीड वाजेचया सुमारास पोहोचते. ही ट्रेन सातारा, सांगली, मिरज, बेळगावी, धारवाड या स्थानकांवर थांबा घेते.

वंदे भारत एक्स्प्रेस
Vande Bharat Sleeper Train : राज्याच्या पहिल्या 'वंदे भारत स्लीपर'चा मान पुण्याला, दिल्लीपर्यंत धावणार? केंद्रीय मंत्र्‍यांकडून स्पष्ट संकेत

नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस

नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस (Nagpur To Secunderabad)आठवड्यातून सहा दिवस धावते. फक्त मंगळवारी बंद असते. नागपूरहून पहाटे ५ वाजता सुटते, अन् सिकंदराबादमध्ये दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी पोहोचते. परतीच्या प्रवासात नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद येथून दुपारी १ वाजता निघते. रात्री ८ वाजून २० मिनिटांनी नागपूरला पोहोचते. सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामगुंडम, काझीपेठ या स्थानकांवर गाडी थांबा घेते.

सरकार प्रत्येक राज्यात बंदे भारत ट्रेनची संख्या वाढवण्याचे काम करत आहे. जेणेकरून रेल्वे कनेक्टिव्हिटीला नवी गती मिळू शकेल. वंदे भारत ट्रेनने खूप कमी वेळात लांबचे अंतर कापले जाते. सामान्य गाड्यांच्या तुलनेत या ट्रेनमध्ये चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. सरकार लवकरच बंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन देखील लॉन्च करणार असल्याची माहिती मिळतेय.

वंदे भारत एक्स्प्रेस
Vande Bharat Express : नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतचं वेळापत्रक काय? कोणत्या मार्गावर धावणार, कुठे किती वेळ थांबते? घ्या जाणून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com