Vande Bharat Sleeper Train : राज्याच्या पहिल्या 'वंदे भारत स्लीपर'चा मान पुण्याला, दिल्लीपर्यंत धावणार? केंद्रीय मंत्र्‍यांकडून स्पष्ट संकेत

Vande Bharat Sleeper Train Pune To Delhi : राज्याच्या पहिल्या वंदे भारत स्लीपरचा मान पुण्याला मिळालेला आहे. केंद्रीय मंत्र्‍यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिलेले आहेत.
वंदे भारत स्लीपर
Vande Bharat Sleeper TrainSaam Tv
Published On

मुंबई : पुणेकरांसाठी खुशखबर आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. त्यानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन पुणे-दिल्ली मार्गावर धावणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-दिल्ली या मार्गावर ट्रेन धावणार असून त्याबाबतचे निवेदन रेल्वे मंत्रालयाला देण्यात आलंय.

पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी, उरुळी कांचन येथे नवीन आणि आधुनिक रेल्वे टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हे टर्मिनल प्रवाशांसाठी सर्व सुविधांसह अत्याधुनिक असेल. तसेच, नवीन कर्जत आणि कामशेत आणि कर्जत आणि तेलगाव दरम्यान रेल्वे मार्ग तयार केले जातील, अशी माहिती मोहोळ (MP Murlidhar Mohol) यांनी दिलीय.

वंदे भारत स्लीपर ट्रेन

सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावर पुणे ते हुबळी दरम्यानच्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या व्हर्च्युअल उद्घाटनाप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केलंय. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद येथून पहिल्यासह इतर अनेक प्रकल्पांसह ट्रेनचे उद्घाटन केले. नमो भारत रॅपिड रेल(पूर्वीची वंदे भारत मेट्रो) पुणे विभागाला देण्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केलीय. ती लवकरच सुरू होईल, याबद्दल आम्ही सकारात्मक (Vande Bharat Sleeper Train Pune To Delhi) आहोत. तसेच पुणे ते लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाशी संबंधित प्रकल्पासाठी आम्ही केंद्र सरकारशी जवळून काम करत आहोत, असं देखील मोहोळ यांनी सांगितलं आहे.

वंदे भारत स्लीपर
Vande Bharat Train : छत्रपती संभाजीनगरात बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स; शेंद्रा एमआयडीसीत ज्युपिटर व्यागोंकाची १०० कोटीची गुंतवणूक

केंद्रीय मंत्र्‍यांकडून स्पष्ट संकेत

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची देखील उपस्थिती ((Vande Bharat Sleeper Train) होती. वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या २ ते ३ महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. या ट्रेनमध्ये एकूण १६ डबे आहेत. ज्यामध्ये ११ एसी,३ -टायर कोच, ४ एसी २ -टायर कोच आणि १ एसी फर्स्ट क्लास कोच आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस ही केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची प्रमुख ट्रेन आहे. या प्रकल्पामागील उद्देश एकाच वेळी रेल्वेला अधिक आरामदायी आणि सुरक्षित बनवणे ((Vande Bharat Train) आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना अनेक प्रकारे मदत होईल, अशी माहिती पुण्याचे खासदार मोहोळ यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलीय.

वंदे भारत स्लीपर
Vande Bharat Express : नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतचं वेळापत्रक काय? कोणत्या मार्गावर धावणार, कुठे किती वेळ थांबते? घ्या जाणून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com