Vande Bharat Train : छत्रपती संभाजीनगरात बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स; शेंद्रा एमआयडीसीत ज्युपिटर व्यागोंकाची १०० कोटीची गुंतवणूक

Sambhajinagar News : वंदे भारत ट्रेनचे पार्टस बनविण्यासाठी जुपिटर तात्राव्यागोंका ही कंपनी १०० कोटीची गुंतवणूक करणार असून या कंपनीत रेल्वेला लागणाऱ्या पार्टचे उत्पादन केले जाणार आहे
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : भारतात रेल्वेचे जाळे पसरत आहे. नवीन रेल्वे गाड्या वेगवेगळ्या लाईनवर धावत आहेत. यात वंदे भारत हि ट्रेन आता सर्वच लाईनवर धावण्याचे नियोजन आहे. यासाठी लागणारे पार्टस आता छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये बनविले जाणार आहेत. यासाठी कंपनीकडून १०० कोटींची गुंतवणूक देखील करणार आहे. 

संभाजीनगरच्या (Sambhajinagar News) शेंद्रा एमआयडीसी परिसरात वंदे भारत ट्रेनचे पार्टस बनविण्यासाठी जुपिटर तात्राव्यागोंका ही कंपनी १०० कोटीची गुंतवणूक करणार असून या कंपनीत रेल्वेला लागणाऱ्या पार्टचे उत्पादन केले जाणार आहे. तर सोबतच वंदे भारत ट्रेनला (Vande Bharat Train) लागणारे पार्ट सुद्धा येथेच बनवण्यात येणार आहे. त्यामुळे सुमारे 200 बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक विवेक लोहिया यांनी दिली. 

Sambhajinagar News
Hingoli Accident : भीषण अपघात..अनियंत्रित ट्रक पलटी होऊन ८५ शेळ्या ठार; अकोला- हैदराबाद महामार्गावरील दुर्घटना

प्रामुख्याने चाकांची होणार निर्मिती 

भारतात रेल्वेच जाळे सर्वत्र पसरले असून रेल्वेच्या चाकांची मागणी जास्त होत आहे. त्यानुसार उत्पादनाला प्राधान्य दिले जाणार असून शेंद्रा औद्योगिक वसाहतीत कंपनी गुंतवणूक करणार आहे. यामुळे व्हील सेट उत्पादनाला चालना मिळणार असून वंदे भारत रेल्वेसाठी लागणाऱ्या पार्टची मागणी देखील पूर्ण करता येईल. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com