भारत नागणे, पंढरपूर प्रतिनिधी
Akluj Latest News : सोलापूरमधील अकलूज जवळील चौंडेश्वरवाडी येथे एक धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा झालेल्या एका गोळीबारात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उषा साठे असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपीचे नाव सचिन देशमुख असे आहे.
रिव्हॉल्व्हरमधून झाडली गोळी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन देशमुख असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सचिन देशमुख याने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून थेट गोळी झाडून एका महिलेची निर्घृण हत्या केली. उषा साठे असे मृत महिलेचे नाव आहे. गोळी लागल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हत्येचे कारण अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, सचिन देशमुख याने उषा साठे यांच्यावर गोळीबार का केला? या हत्येमागचे मुख्य कारण काय होते? हे अद्याप समजू शकलेले नाही.
पोलीस पथके तैनात, आरोपीचा शोध सुरू
गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी सचिन देशमुख हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तात्काळ चक्रावून फिरवली असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.