उसनवारीच्या पैशावरून यवतमाळमध्ये महिलेचा खून; मुलगाही गंभीर जखमी
उसनवारीच्या पैशावरून यवतमाळमध्ये महिलेचा खून; मुलगाही गंभीर जखमीSaam Tv

उसनवारीच्या पैशावरून यवतमाळमध्ये महिलेचा खून; मुलगाही गंभीर जखमी

लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर मध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
Published on

संजय राठोड

यवतमाळ : पैशाच्या वादातून महिलेचा खून झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे. लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सविता नरेंद्र जाधव रा. इंदिरानगर, लोहारा असे मृतक महिलेचे नाव आहे, तर या घटनेत दिशेंद्र नरेंद्र जाधव हा जखमी झाला आहे. पवन जयंत चेके रा. इचोरी याने पैशाच्या देवाण- घेवाणीतून महिलेचा खून केला आहे.

हे देखील पहा-

या दरम्यान मुलगा दिशेंद्र हा देखील जखमी झाला आहे. महिलेच्या खुनाची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रात्रीच्या सुमारास पाठविण्यात आले आहे. तसेच रात्री उशीरापर्यंत या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

उसनवारीच्या पैशावरून यवतमाळमध्ये महिलेचा खून; मुलगाही गंभीर जखमी
खळबळजनक: शेतातील सोयाबीनच्या 39 पोत्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

शहरात नुकतेच दुहेरी हत्याकांड घडले आहे. या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच पुन्हा खुनाची घटना घडल्याने शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. उधारीच्या पैशातून महिलेचा खून केल्याची गंभीर घटना यवतमाळ शहरातील लोहारा मधील इंदिरा नगरात घडली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com