बीड : अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे, आता चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. काढणी केलेल्या पिकांवरच चोरटे डल्ला मारत असल्याचे प्रकार जिल्ह्यामध्ये उघडकीस येत आहेत. २ दिवसांपूर्वी बीडच्या माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील शेतकऱ्याने, सोयाबीनचे ३९ पोटे होते. ते काढून शेतामध्ये ठेवले होते.
मात्र, या पोत्यांवर अज्ञातच चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पात्रुड येथील शेतकरी कुलदीप इंद्रजीत शिंदे यांनी, त्यांच्या ५ एकर शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. अतिवृष्टीने प्रचंड नुकसान होऊनही त्यांनी मोठी मेहनत घेतल्याने ५ एकरमध्ये त्यांना ११७ पोते सोयाबीन झाली होती. ही सोयाबीन त्यांनी शेतात वाळू घातली होती.
हे देखील पहा-
रात्रीच्या सुमारास यातील ३९ पोते सोयाबीन भरून ते शिऊन शेतात ठेवले होते. पाऊस पडल्याने शेतात वाहन जात नसल्यामुळे, त्यांनी त्याठिकाणी पोते झाकून ठेवले होते, आणि रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ते घरी आले होते. दिवसभर काम करून थकल्यामुळे ते पुन्हा शेतात न जाता घरीच झोपले होते. सकाळी उठून ते जेव्हा शेतात गेले, तेव्हा शिवून ठेवलेले ३९ पोते चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.
याविषयी इंद्रजित शिंदे यांनी माजलगाव ग्रामीण पोलीसांना घटनेची माहिती दिल्यानंतर, बीट अमलदारांनी याची पाहणी केली. तर याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे.
या अस्मानी संकटानंतर शेतकरी कसाबसा उभा ठाकण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्याच्यासमोर पुन्हा हे नवं संकट निर्माण झाले आहे. अतिवृष्टीत कसंबसं राहिलेल्या, पिकांवर आता चोरटे डल्ला मारत असल्याने, जिल्ह्यातील शेतकरी दहशतीखाली आला आहे. त्यामुळे तात्काळ या चोरांचा बंदोबस्त करावा. अन्यथा शेकाप रुमने घेऊन रस्त्यावर उतरेल. असा इशारा शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.