

संजय सूर्यवंशी, नांदेड प्रतिनिधी
eknath shinde and uddhav thackeray news : "राजकारणात काहीही होऊ शकते. ज्यांच्याविरोधात आयुष्यभर शस्त्रे उपसली, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली आहे. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील आणि तो आम्हा सर्वांना मान्य असेल," अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार हेमंत पाटील यांनी दिली.
"राजकारणात काहीही होऊ शकतं. दोन्ही सेना एकत्रण्याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. युतीत अजून खडा पडलेला नाही, मात्र वरिष्ठांनी लक्ष देण्याची निश्चित गरज निर्माण झाली आहे," असे आमदार हेमंत पाटील म्हणाले.
"एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या असल्या, तरी शिवसैनिकांचे एकमेकांशी आपुलकीचे संबंध आहेत. शिवसैनिक आजही एकमेकांच्या सुख-दुःखात एकत्र येतात. जर आतून शिवसेना एक असती, तर महाराष्ट्रात आज वेगळे चित्र पाहायला मिळाले असते आणि नांदेड जिल्ह्यात जी फरफट होत आहे, ती झाली नसती," असेही हेमंत पाटील म्हणाले.
तसेच, "भाजप आणि शिवसेनेत स्थानिक पातळीवर नक्कीच मतभेद आहेत. त्यामुळे जे कोणी पालकमंत्री आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन हे वाद सोडवले पाहिजेत. युतीत अजून खडा पडलेला नाही; मात्र वरिष्ठांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची निश्चित गरज निर्माण झाली आहे," अशा शब्दांत भाजप-शिवसेनेतील वादावर हेमंत पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.