मोठी राजकीय घडामोड! शिवसेना २, भाजपची १ जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट

Jalgaon District Bank Election: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या तीन जागांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
Jalgaon District Bank Election:
Jalgaon District Bank Election:
Published On: 

संजय महाजन, प्रतिनिधी जळगाव प्रतिनिधी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली असून, महायुतीच्या ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या दोन, तर भाजपच्या एका जागेचा समावेश आहे. पारोळा, एरंडोल आणि भुसावळ विकास सोसायट्यांच्या (सोसायटी) मतदारसंघातून इतर कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे ही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

कुणाची झाली बिनविरोध निवड?

पारोळा मतदारसंघ: शिवसेनेच्या नलिनी चिमणराव पाटील (आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री).

एरंडोल मतदारसंघ: मृणाल अमोल पाटील (आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी).

भुसावळ मतदारसंघ: रजनी संजय सावकारे (मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी).

जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आणि प्रत्यक्ष मतदानापूर्वीच या तीन जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज न आल्याने ही निवड बिनविरोध झाली.

Jalgaon District Bank Election:
IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडला विजयाचा सूर सापडला, पण भारताने या ५ चुका केल्या नसत्या तर...

जागावाटपाचा तिढा सुटण्याआधीच घडामोडी:

महायुतीमध्ये अद्याप जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नसतानाच या तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच, आमदार अमोल पाटील यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी चर्चेतून आपल्या कुटुंबातील दोन जागा बिनविरोध करून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Jalgaon District Bank Election:
Tukaram Mundhe : ५ FDA अधिकार्‍यांना सस्पेंड केलं, २१ अधिकारी रडारावर, तुकाराम मुंढेंची सर्वात मोठी कारवाई

"बिनविरोध निवड झाल्याची माहिती मिळाल्यामुळे मी अमोल पाटील यांचे अभिनंदन करायला आलो होतो," अशी सूचक प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. तर, "आमदार मंगेश चव्हाण यांच्या पॉलिटिकल स्किलचा थोडा वापर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केला," अशी प्रतिक्रिया आमदार अमोल पाटील यांनी दिली. या सर्व घडामोडींमुळे शिवसेना शिंदे गटातील एक गट भाजपासोबत जुळवून घेत असल्याचे दिसून येत असून, आता जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे अंतिम चित्र काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.