कुछ तो बडा होने वाला है ! राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी CM फडणवीस मैदानात

NCP Merger Talks Devendra Fadnavis Steps In Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा रंगलीय... दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचं मैदानात उतरणार आहेत...नेमकं प्रकरण काय आहे...राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का?
WILL NCP FACTIONS MERGE? DEVENDRA FADNAVIS STEPS INTO TALKS
WILL NCP FACTIONS MERGE? DEVENDRA FADNAVIS STEPS INTO TALKSsaam tv
Published On

राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप होण्याची शक्यताय....23 ऑगस्टला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जयंत पाटलांमध्ये बैठक पार पडली...या बैठकीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.... एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं विलिनीकरणावर बैठक घेतलेली असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकऱणासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचं मैदानात उतरल्याचं बोललं जातयं... आणि त्याला कारण ठरलयं... महायुतीनं बोलावली समन्वय समितीची बैठक...

समन्वय समितीच्या या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर उपस्थित राहणार आहेत...गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोर धरू लागलीय...त्यामुळे महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

मुळात अजितदादांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंबंधी अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्याचे दावे-प्रतिदावे दोन्ही बाजूनं करण्यात आले. मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी वारंवार चर्चांना केराची टोपली दाखवलीय...त्यात चर्चेतून आरोप-प्रत्यारोपाच्या खेळीशिवाय काहीएक हाती लागले नाही. भाजपसोबत राहायचं की महाविकास आघाडीसोबतच घरोबा करायचा असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेत... त्यात गेल्या महिन्याभरात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रीय स्तरावरील मोठ्या नेत्यांची भेट घेतली... आता पुन्हा शरद पवारांनीही 29 ऑगस्टला कोअर कमिटिची बैठक बोलावलीय....त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब होणार की केवळ राजकीय विश्वात चर्चाच रंगत राहणार याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com