Missing link News: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ एक्सप्रेसवेला 'मिंसिग' नाव का पडलं? जाणून घ्या अनोख्या नावामागचं रहस्य

Missing Link Project: मुंबई-पुणे मिसिंग लिंक एक्सप्रेसवे अखेर सुरू झाला असून प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी झाला आहे. सुरक्षित, वेगवान आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज हा मार्ग प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
Missing Link Project
Missing Link Projectsaam tv
Published On

मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आली. ज्या मिसिंग लिंकबद्दल आपण अनेक वर्षांपासून ऐकत होतो तो अखेर प्रत्यक्षात प्रवाशांसाठी खुला झाला आहे. या प्रकल्पाची सुरुवात २००२ मध्ये द्रुतगती मार्गाच्या बांधकामाने झाली होती.

विशेष म्हणजे 'मिसिंग लिंक' हा केवळ टेकनिकल शब्द नाहीये तर तो अनेक वर्षे अस्तित्वात नसलेल्या एका अपूर्ण भागाला संबोधित करतो. आता हा भाग पूर्ण होऊन खुला झाल्ला आहे. आज आपण जाणून घेऊया हा मिसिंग लिंक इतका महत्त्वाचा का आहे.

Missing Link Project
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

मिसिंग लिंक हे नाव कसं पडलं?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला नियंत्रित-एक्सेस द्रुतगती मार्ग आहे. ज्यामुळे दोन प्रमुख शहरांमधील प्रवास सोपा झाला. दरम्यान खोपोली आणि खंडाळा व लोणावळा दरम्यानचा घाट विभाग आव्हानात्मक होता. त्यामुळेच तो त्यावेळी अपूर्ण राहिला.

परिणामी, रस्ता पूर्ण होऊनही, प्रवाशांना जुन्या, वळणदार आणि धोकादायक घाटमार्गावरूनच प्रवास करावा लागत होता. ही मिसिंग गोष्ट एक महत्त्वाची लिंक ठरली. आता, बोगदे, उंच पूल आणि आधुनिक अभियांत्रिकी यांचा उत्कृष्ट मिलाफ असलेला हा नवीन १३.३ किलोमीटरचा विभाग तयार आहे.

का गरजेचा होता मिसिंग लिंक?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या या भागाचं नियोजन सुरुवातीला करण्यात आलं होतं. परंतु अभियांत्रिकी आव्हानांमुळे त्याचं बांधकाम उशिरा पूर्ण झालं. या भागाशिवाय द्रुतगती मार्ग अपूर्ण राहिला असता. वाहतुकीला जुन्या घाट रस्त्यावरून वळसा घालावा लागत असे, ज्यामुळे अनेकदा ट्रॅफिक, अपघात आणि वेळे वाया जात होता. या लिंकच्या बांधकामामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे. यामुळे आता प्रवास सुरक्षित आणि जलद गतीने होणार आहे.

Missing Link Project
Indian railway: भारतीय रेल्वे रोज किती कोटींची वीज वापरते? आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल

प्रवासासाठी किती वेळ होणार?

हा नवीन मार्ग सुरू झाल्यामुळे अंतर अंदाजे ६ किलोमीटरने आणि प्रवासाचा वेळ २५ ते ३० मिनिटांनी कमी झाला आहे. या नवीन मार्गामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा घाटात भागात भूस्खलन आणि वाहतूक कोंडी सामान्य असते.

Missing Link Project
Aadhar Card : मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?

सुरुवातीच्या टप्प्यात निर्बंध का?

सरकारने स्पष्ट केलंय की, हा द्रुतगती मार्ग मे ते ऑक्टोबर २०२६ पर्यंत मर्यादित संख्येतील वाहनांसाठी खुला राहील. हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. नवीन पायाभूत सुविधा बरीच गुंतागुंतीची आहे, त्यामुळे ती सुरक्षितपणे कार्यरत राहील याची खात्री अधिकाऱ्यांना करणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com