Aadhar Card : मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?

Aadhar Card Update News : UIDAI ने आधार अपडेटसाठी नवीन शुल्क जाहीर केले आहे. नाव, पत्ता आणि इतर तपशील बदलण्यासाठी ७५ रुपये शुल्क, तर बायोमेट्रिक अपडेटसाठी १२५ रुपये शुल्क लागू आहे. मात्र myAadhaar पोर्टलवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अपडेट मोफत आहे.
AADHAAR UPDATE CHARGES 2026: UIDAI ANNOUNCES FEES FOR NAME, ADDRESS AND BIOMETRIC CORRECTIONS
AADHAAR UPDATE CHARGES 2026: UIDAI ANNOUNCES FEES FOR NAME, ADDRESS AND BIOMETRIC CORRECTIONSSaam Tv
Published On
Summary
  • आधार अपडेटसाठी नवीन शुल्क लागू

  • डेमोग्राफिक अपडेटसाठी ₹७५, बायोमेट्रिकसाठी ₹१२५

  • ऑनलाइन अपडेट ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मोफत

  • अधिकृत पोर्टलवरून अपडेट करणे सुरक्षित

आधार कार्ड आजच्या घडीला प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक आहे. सरकारी योजना, बँकिंग सेवा, मोबाईल सिम कार्ड घेणे अशा अनेक कामांसाठी आधारची गरज भासते. त्यामुळे आधारवरील नाव, पत्ता, मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख (DOB) यामध्ये काही चूक असल्यास ती तात्काळ दुरुस्त करणे गरजेचे ठरते. याबाबत आधारची नियामक संस्था UIDAI ने अद्ययावत शुल्काबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

UIDAI च्या माहितीनुसार, आधारमधील डेमोग्राफिक माहिती म्हणजेच नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा जन्मतारीख अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्रात आता ७५ रुपये आकारले जातील. हे शुल्क प्रत्येक अपडेटसाठी वेगळे असते. त्यामुळे, वारंवार छोटे बदल करण्याऐवजी एकाच वेळी सर्व आवश्यक बदल करून घेणे अधिक फायदेशीर ठरते.

AADHAAR UPDATE CHARGES 2026: UIDAI ANNOUNCES FEES FOR NAME, ADDRESS AND BIOMETRIC CORRECTIONS
Mumbai Goa Highway : कोकणवासीयांचा प्रवास होणार सुसाट! मुंबई गोवा महामार्ग ९० टक्के पूर्ण, फक्त या ठिकाणाचे काम सुरू

याशिवाय, आधारमधील बायोमेट्रिक माहिती जसे की बोटांचे ठसे, डोळ्यांची बाहुली (आयरिस) किंवा फोटो अपडेट करण्यासाठी १२५ रुपये आकारले जातील. विशेषतः मुलांचे वय वाढत असताना किंवा जुन्या बायोमेट्रिक माहितीमुळे अडचणी येत असल्यास हे अपडेट करणे आवश्यक ठरते. ५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी काही कालावधीपर्यंत हे अपडेट मोफत असते, मात्र त्यानंतर शुल्क लागू होते.

AADHAAR UPDATE CHARGES 2026: UIDAI ANNOUNCES FEES FOR NAME, ADDRESS AND BIOMETRIC CORRECTIONS
Shocking : वहिनीसोबतचं अफेअर पत्नीला समजलं; पतीने प्रेयसीच्या मदतीने केली पत्नीची हत्या, थरारक घटनेने सर्वजण सुन्न

एक दिलासादायक बाब म्हणजे, myAadhaar पोर्टलद्वारे कागदपत्रे अपडेट करण्याची सुविधा सध्या मोफत उपलब्ध आहे. ही सवलत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू आहे. त्यामुळे, ऑनलाइन पद्धतीचा वापर करून नागरिक आपले पैसे वाचवू शकतात. ओळख आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करण्यासाठी ऑनलाइन पर्याय अधिक सोयीस्कर आणि जलद ठरतो.

AADHAAR UPDATE CHARGES 2026: UIDAI ANNOUNCES FEES FOR NAME, ADDRESS AND BIOMETRIC CORRECTIONS
Shocking : परीक्षेत कमी गुण मिळाले, ११ वीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; वडिलांची बंदूक घेतली अन्...

तसेच, UIDAI ने नागरिकांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे की, नेहमी अधिकृत वेबसाइट, ॲप किंवा आधार सेवा केंद्राचाच वापर करावा. एजंट किंवा अनोळखी व्यक्तींमार्फत आधार अपडेट करताना फसवणुकीचा धोका असू शकतो. एकूणच, आधार माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. योग्य पद्धतीने आणि अधिकृत माध्यमातून अपडेट केल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com