स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का मिळाला नाही? RSS प्रमुख मोहन भागवत यांंचं मोठं विधान

Bharat Ratna For Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का मिळाले नाही? या प्रश्नावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मोठे विधान केले आहे.
RSS Chief Mohan Bhagwat addressing the audience during the RSS centenary lecture series in Mumbai.
RSS Chief Mohan Bhagwat addressing the audience during the RSS centenary lecture series in Mumbai.Saam Tv
Published On

देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या संदर्भातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न अद्याप का मिळाला नाही? असे मोहन भागवत यांना विचारले असता ते म्हणाले की, मी त्या समितीमध्ये नाही त्यामुळे मला माहीत नाही. पण जर तो सन्मान त्यांना मिळाला तर त्या पुरस्काराचे नक्कीच महत्व वाढेल असं मोठं विधान मोहन भागवत यांनी केले.

RSS Chief Mohan Bhagwat addressing the audience during the RSS centenary lecture series in Mumbai.
Chandrapur Politics: मोठी घडामोड! भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेची ऑफर, काँग्रेसचं टेन्शन वाढलं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मुंबईतील वरळी सेटरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दोन दिवसीय संघ प्रवासाची 100 वर्षे नवे क्षितिज या व्याख्यान मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या पर्वात भागवत यांनी संघाची भूमिका, स्थापना आणि कार्याची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसीया, कोकणचे संघचालक अर्जुन चांदेकर, मुंबई महानगरचे संघचालक सुरेश भगेरिया उपक्षित होते. राजकारण, कला, प्रशासन, साहित्य, मनोरंजन क्षेत्रातील मुंबईमधील 900 हून अधिक प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

RSS Chief Mohan Bhagwat addressing the audience during the RSS centenary lecture series in Mumbai.
'त्या' दिवशी अजितदादांसोबत विमानात PA का नव्हता? खासदाराने व्यक्त केला संशय

सलमान खानसह उद्योगपतींची उपस्थिती

शनिवारी बॉलीवूड अभिनेता सलमान खानची उपस्थिती ही चर्चेची विषय ठरली. दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, विपुल शहा, अनुराधा पौडवाल, अदनान सामी, हेमा मालिनी, रणबीर कपूर, खासदार उज्ज्वल निकम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई मेट्रोच्या एमडी अश्विनी भिडे आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com