भाजपच्या मोर्चावेळी का संतापल्या टीना चौधरी? गिरीश महाजनांबाबत काय म्हणाल्या?

Who is Tina Chaudhary : मुंबईतील भाजपच्या रॅलीदरम्यान गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या टीना चौधरी यांचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्यांनी आपल्या मोर्चावेळी काय घडलं याची माहिती दिली आहे.
Who is Tina Chaudhary :
Tina Chaudhary confronting minister Girish Mahajan during a BJP rally in Mumbai amid heavy traffic congestion.saam tv
Published On

लोकसभेत महिला आरक्षणासाठीचं घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर महायुतीने २१ एप्रिलला मुंबईत मोर्चा काढला होता. मुंबईतील वरळीत संध्याकाळच्या सुमारास हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली होती, त्यावेळी एका महिलेनं मंत्री गिरीश महाजन यांना सुनावलं होतं. गिरीश महाजन यांना गेट आऊट म्हणणारी ही महिला कोण असा शोध अनेकजण घेत होते.

Who is Tina Chaudhary :
भाजपच्या मोर्चावर ताईंनी बाटली फेकून मारली; 'त्या' घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

या महिलेचं नाव आहे टीना चौधरी. मंत्र्यांनाच खडसावल्यानंतर अनेकांनी या महिलेला ट्रोल केलं तर काहींना त्यांना शेरणी म्हणून उपाधी दिली. परंतु आता या टीना चौधरी यांचा त्या घटनेबद्दलचा एका व्हिडिओ आला आहे. टीना चौधरी यांनी या व्हिडिओतून आपण का संताप व्यक्त केला. राजकारण करू नका? असं म्हणत माझ्या खांद्यावरून राजकारणाची पोळी भाजू नका असं म्हणाल्या आहेत. या महिलेनं सर्व राजकीय पक्षांना केलं आहे. सोबतच त्यावेळी केवळ गिरीश महाजन हे एकमेव व्यक्ती होती, ज्यांनी माझं ऐकून घेतलं, असं टीना चौधरी म्हणाले आहेत.

Who is Tina Chaudhary :
मिसिंग लिंकवरील रक्ताच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; खोपोली पोलिसात गोहत्या झाल्याची तक्रार

काय म्हणाल्या टीना चौधरी?

टीना चौधरी त्या घटनेबाबत म्हणाल्या, "त्या दिवशी मी माझ्या मुलीला संगीत क्लासमध्ये सोडलं. पण घरी परतताना जवळपास २५ मिनिटे मी कारमध्ये होती. ट्रॅफिक जागेचं हलत नव्हते. त्यावेळी मी कारमधून उतरले आणि कारण काय आहे ते जाणून घेतलं. आमच्या कारच्या समोर बस पार्क करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुढचे दीड तास मी प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला विनंती केली. आमच्या समोरच्या बस जर हटवल्या तर ट्रॅफिक कमी होईल, असं मी त्यांना वारंवार सांगत होते."

परंतु मला पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद आला नाही, कुणीही मदत माझा आवाज ऐकला नाही. मी घरी कधी पोहोचणार याचा काहीही अंदाज नव्हता. परंतु गिरीश महाजन हे त्या रॅलीत एकमेव व्यक्ती होते, ज्यांनी माझं म्हणणं ऐकलं. नंतर त्यांच्याच निर्देशानंतर त्या दोन बस बाजूला करण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com