

मराठी डिजिटल माध्यमांच्या विश्वात पुन्हा एकदा ई सकाळने आपली मजबूत पकड सिद्ध केलीये. कॉमस्कोरच्या ताज्या अहवालानुसार, ई सकाळ या डिजिटल प्लॅटफॉर्मने महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवलंय. वाचकांनी पुन्हा एकदा ई सकाळवर विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणावर या वेबसाइटला पसंती दिलीये. त्यामुळे सर्वाधिक लोकांनी ई सकाळच्या संकेतस्थळावर भेट देत विविध बातम्या वाचल्या आहेत.
ई सकाळने नेहमीच विश्वासार्ह आणि वाचकांच्या उपयोगाच्या बातम्या देण्यावर भर दिला आहे. वाचकांच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडतील अशा माहितीपूर्ण बातम्या पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला. याच विश्वासाच्या जोरावर ई सकाळने पुन्हा एकदा आपण महाराष्ट्रातील नंबर १ डिजिटल प्लॅटफॉर्म असल्याचं सिद्ध केलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कॉमस्कोरच्या क्रमवारीत ई सकाळ सातत्याने पहिल्या स्थानावर कायम आहे.
कॉमस्कोरच्या रिपोर्टनुसार, ई सकाळच्या वेबसाइटला तब्बल ६.५ कोटी म्हणजेच ६५.५ मिलियन युनिक व्हिजिटर्स मिळाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने वाचकांनी ई सकाळवरील बातम्यांना पसंती दिली आहे. पारंपरिक सकाळ वृत्तपत्रापासून डिजिटल माध्यमातील ई सकाळपर्यंतचा हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी मानला जात आहे.
ई सकाळने सुरुवातीपासूनच विश्वासार्ह पत्रकारितेला प्राधान्य दिलं आहे. अचूक, स्पष्ट आणि खात्रीशीर माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ई सकाळ सातत्याने करत आहे. याच प्रामाणिक कामामुळे वाचकांनीही ई सकाळवर नेहमीच विश्वास ठेवला आहे. त्यामुळेच ई सकाळ महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि नंबर १ डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म म्हणून पुढे आला आहे.
ई सकाळच्या या यशामध्ये साम टीव्ही आणि सरकारनामा या प्लॅटफॉर्मचंही महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. या दोन्ही माध्यमांनीही वाचकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेत उपयुक्त बातम्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे वाचकांचा विश्वास अधिक मजबूत झाला आणि ई सकाळच्या डिजिटल प्रवासाला मोठं बळ मिळालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.