Signs Before Death: मृत्यूच्या २४ तास आधी शरीर देतं हे ६ संकेत, जाणून घ्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्याचं सत्य

Surabhi Jayashree Jagdish

मृत्यू

मृत्यू हा जीवनाचा एक नैसर्गिक टप्पा आहे आणि त्यापूर्वी शरीरात काही बदल दिसू लागतात. हे बदल प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात, पण काही सामान्य लक्षणे अनेक वेळा आढळतात. मृत्यूपूर्वी २४ तास अगोदर कोणती लक्षणं दिसतात ते पाहूयात.

end of life symptoms

श्वासोच्छ्वासातील बदल

मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास अनियमित होऊ लागतो. कधी श्वास खूप हळू होतो तर कधी अचानक वेगाने होतो. ज्याला चेन-स्टोक्स पॅटर्न म्हणतात. श्वास घेताना वेगळा आवाज येऊ शकतो.

body changes before death

शरीराची उर्जा कमी होणं

व्यक्ती अत्यंत थकलेली आणि अशक्त वाटू लागते. साधी हालचाल करणं किंवा बोलणंही कठीण होतं. अशावेळी व्यक्ती जास्त वेळ झोपेत किंवा अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत राहते.

low energy before death

तहान कमी होणं

मृत्यूपूर्वी व्यक्तीची खाण्याची आणि पिण्याची इच्छा कमी होते. यामुळे शरीराला उर्जाही कमी मिळू लागते. काही वेळा पूर्णपणे अन्न-पाणी रूग्ण घेत नाही.

appetite loss before death

त्वचेच्या रंगात बदल

शरीरातील रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे त्वचा फिकट किंवा निळसर दिसू लागते. विशेषतः हात-पाय थंड पडतात आणि रंग बदलतो. हे शरीराच्या अंतर्गत अवयवांकडे रक्त जास्त प्रवाहित होत असल्याचे संकेत असतात.

skin color changes death

मानसिक स्थितीत बदल

व्यक्ती गोंधळलेली किंवा अस्वस्थ दिसू शकते. काही वेळा ती व्यक्ती ओळखीच्या लोकांना ओळखू शकत नाही किंवा वेगवेगळ्या गोष्टी बोलते. भ्रम किंवा भास होणंही या अवस्थेत सामान्य असते.

mental confusion symptoms

नाडी कमी होणं

हृदयाचं कार्य मंदावल्यामुळे नाडी हळू आणि कमकुवत होते. रक्तदाब कमी होतो आणि शरीरातील अवयवांना कमी रक्तपुरवठा होतो. हे मृत्यू जवळ आल्याचं एक महत्त्वाचं संकेत मानलं जातं.

pulse weak before death

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

shivaji maharaj
येथे क्लिक करा